इगतपुरीत मुसळधार पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 00:17 IST2021-06-02T00:17:14+5:302021-06-02T00:17:45+5:30
इगतपुरी : पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यासह शहरात जूनच्या पहिल्याच तारखेला पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. त्यामुळे सर्व परिसरात गारवा निर्माण झाला होता.

महामार्गावर भर पावसात मार्गक्रमण करताना वाहने.
ठळक मुद्देचालकांना कसरत करीत जावे लागत असल्याचे चित्र
इगतपुरी : पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यासह शहरात जूनच्या पहिल्याच तारखेला पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. त्यामुळे सर्व परिसरात गारवा निर्माण झाला होता.
शहरातील खड्डेमय झालेल्या जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावर पाणी वाहू लागल्याने पादचारी व वाहनधारकांना सुमारे दोन ते तीन तास पाऊस थांबण्याची प्रतीक्षा करावी लागली. पावसामुळे झाकोळलेल्या वातावरणात वीजपुरवठा खंडित झाल्याने शहरात अंधार पसरला होता. महामार्गावर वाहन संथगतीने सुरू असून पावसातही महामार्गावर धुके पसरले असल्याने चालकांना कसरत करीत जावे लागत असल्याचे चित्र दिसत होते.