शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

प्रकल्पग्रस्त पुन्हा धरणात उड्या घेण्याच्या तयारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 6:59 PM

महापालिकेने वाढत्या लोकसंख्येचा विचार करता कश्यपी धरणाची उभारणी केली, यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करताना त्यांना मोबदला देतानाच, पुनर्वसन व प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यापैकी फक्त २६ जणांना महापालिकेत सामावून

ठळक मुद्देकश्यपीप्रश्न : गंगापूरधरणात पाणी सोडण्यास विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गेल्या वीस वर्षांपासून प्रलंबित असलेल्य कश्यपी धरणग्रस्तांचे पुनर्वसन व प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना महापालिकेच्या सेवेत सहभागी करून घेण्यास होणारा विलंब पाहता, पुन्हा एकवार पाचही गावातील प्रकल्पग्रस्तांनी आंदोलनाचा इशारा दिला असून, कश्यपी धरणग्रस्तांचे प्रश्न सुटेपर्यंत गंगापूर धरणात पाणी सोडण्यास विरोध दर्शवून प्रसंगी धरणाच्या पाण्यात उड्या घेण्याची तयारी चालविली आहे.दोन दिवसांपूर्वीच धोंडेगाव, देवरगाव, गोळशी, खड्याची वाडी येथील ग्रामस्थांनी अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. महापालिकेने वाढत्या लोकसंख्येचा विचार करता कश्यपी धरणाची उभारणी केली, यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करताना त्यांना मोबदला देतानाच, पुनर्वसन व प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यापैकी फक्त २६ जणांना महापालिकेत सामावून घेतले असून, उर्वरित ३६ जणांना आजही प्रतीक्षा आहे. शिवाय धरणात जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्तांचे अद्यापही पुनर्वसन झालेले नाही. गेल्या वीस वर्षांपासून या संदर्भात सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा सुरू असतानाही त्याची दखल घेतली जात नसल्याचे पाहून २०१६ मध्ये प्रकल्पग्रस्तांनी थेट धरणाच्या पाण्यात उड्या घेतल्यामुळे सरकार खडबडून जागे झाले. त्यानंतर शासकीय समिती गठीत करून त्याबाबत वारंवार बैठका झाल्या, प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याचे ठरविण्यात आले, परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने गंगापूर धरणात जेमतेम ५६ टक्केच जलसाठा आहे, धरणाच्या पाण्यावर असलेले आवर्तन पाहता, लवकरच कश्यपी धरणातून गंगापूर धरणात पाणी सोडण्याचे नियोजन पाटबंधारे खात्याने सुरू केले असून, कश्यपी धरणात ९३ टक्के म्हणजेच १७२६ दशलक्ष घनफूट इतके पाणी शिल्लक आहे. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन कश्यपी धरणग्रस्तांनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. महापालिकेने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, जलसंपदा विभागाने त्यासाठी पुढाकार घ्यावा तसेच पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी निवेदनात केली आहे. या मागण्यांचा विचार न झाल्यास गंगापूर धरणात कश्यपीतून पाणी सोडू दिले जाणार नाही, तसा प्रयत्न केल्यास धरणात उड्या मारून जलसमाधी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी सरपंच काशीनाथ दत्तू मोंढे, सुकदेव सोनू मोंढे, सोमनाथ लक्ष्मण मोंढे, राजाराम भिका बेंडकोळी आदी उपस्थित होते.

टॅग्स :Waterपाणीnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय