खामखेडा परिसरात तुरळक पाऊसाच्या सरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 18:56 IST2019-12-25T18:55:19+5:302019-12-25T18:56:35+5:30
खामखेडा : गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने पाऊसाजन्य वातावरण निर्माण होऊन आजूबाजूच्या काही ठिकाणी पाऊस होत असल्याचे बातम्या ऐकावयास येत होते. त्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

खामखेडा परिसरात तुरळक पाऊसाच्या सरी
खामखेडा : गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने पाऊसाजन्य वातावरण निर्माण होऊन आजूबाजूच्या काही ठिकाणी पाऊस होत असल्याचे बातम्या ऐकावयास येत होते. त्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
परंतु काल कोणतेही दुपार पर्यत पाऊसाचे वातावरण नव्हते. त्यामुळे शेतकरी थोडया- फार प्रमाणात सुखी होता. परंतु पाच वाजेच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन पाऊसाचे वातावरण तयार होऊन तुरळक पावसाला सुरु वात झाली. या पाऊसामुळे रब्बी पिकातील प्रमुख कांदा पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होईल यांची चिंता शेतकरी वर्गाकडून व्यक्त करण्यात येत आहे. तसेच उन्हाळी कांद्याचे रोपे खराब होतील कि काय यांची भीती शेतकरी वर्गाला वाटत आहे.