प्रेमसुख संचेती यांच्यासह २६ वकीलांचा होणार सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 01:54 IST2020-02-16T01:54:09+5:302020-02-16T01:54:25+5:30

शहरात होत असलेल्या वकील परिषदेच्या निमित्ताने बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अ‍ॅण्ड गोवातर्फे औरंगाबाद येथील प्रख्यात वकील प्रेमसुख एम. संचेती यांच्यासह राज्यभरातील सुमारे २६ वकिलांचा रविवारी (दि.१६) सत्कार करण्यात येणार आहे.

 Preamukh Sancheti along with 3 lawyers will be honored | प्रेमसुख संचेती यांच्यासह २६ वकीलांचा होणार सत्कार

प्रेमसुख संचेती यांच्यासह २६ वकीलांचा होणार सत्कार

नाशिक : शहरात होत असलेल्या वकील परिषदेच्या निमित्ताने बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अ‍ॅण्ड गोवातर्फे औरंगाबाद येथील प्रख्यात वकील प्रेमसुख एम. संचेती यांच्यासह राज्यभरातील सुमारे २६ वकिलांचा रविवारी (दि.१६) सत्कार करण्यात येणार आहे. न्यायालयीन कामकाजातील प्रदीर्घ सेवेसाठी हे सत्कार करण्यात येणार आहेत.
मूळ औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथील रहिवासी असलेले प्रेमसुख संचेती औरंगाबाद येथे गेल्या ५८ वर्षांपासून वकिली व्यवसायात कार्यरत आहेत. त्यांनी १९६२ पासून वकिली सुरू केली असून, रेंट कंट्रोल येथे वकिली केली. त्यानंतर औरंगाबाद जिल्हा न्यायायल व उच्च न्यायालयाचे खंडपीठ झाल्यानंतर तिथेही त्यांनी वकिली केली. वयाच्या ८४व्या वर्षीही ते प्रत्येक खटल्यासाठी मेहनत घेतात. राज्यस्तरीय वकील परिषदेच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी कृषिमंत्री शरद पवार, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत संचेती व अन्य मान्यवरांना गौरविण्यात येणार आहे.

Web Title:  Preamukh Sancheti along with 3 lawyers will be honored