प्रसाद महाराजांचे लोहोणेरला स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 01:16 IST2021-02-20T20:38:06+5:302021-02-21T01:16:56+5:30

लोहोणेर : अंमळनेर येथील विठ्ठल भक्त सखाराम महाराज संस्थानचे प्रसाद महाराज अंमळनेरकर यांचे सेवेकऱ्यांसह शनिवारी (दि.२०) लोहोणेर येथे आगमन झाले. यावेळी ह.भ.प.प्रसाद महाराज यांचे येथील शिष्य गणाचेवतीने स्वागत करण्यात आले.

Prasad Maharaj welcomes Lohoner | प्रसाद महाराजांचे लोहोणेरला स्वागत

प्रसाद महाराजांचे लोहोणेरला स्वागत

ठळक मुद्देकीर्तनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

लोहोणेर : अंमळनेर येथील विठ्ठल भक्त सखाराम महाराज संस्थानचे ह.भ.प. प्रसाद महाराज अंमळनेरकर यांचे सेवेकऱ्यांसह शनिवारी (दि.२०) लोहोणेर येथे आगमन झाले. यावेळी ह.भ.प.प्रसाद महाराज यांचे येथील शिष्य गणाचेवतीने स्वागत करण्यात आले.
                प्रसाद महाराज यांचे लोहोणेर येथे तीन दिवस वास्तव्य असते. महाराजांचे आगमन झाले त्यावेळी शतनु महाराज लोहोणेरकर, येथील भजनी मंडळ व महाराजांचे शिष्य हे स्वागतास हजर होते. या निमित्ताने लोहोणेर येथे हरिपाठ , कीर्तनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
               तर येथील शिष्टमंडळाकडे दुपारी व सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असते. ठिक - ठिकाणी महाराजांच्या पान सुपारीचे आयोजन करण्यात येत असते. यावेळी ह. भ. प.अंमळनेर महाराजांचा लोहोणेर सह परिसरातील शिष्य गण मोठ्या संख्येने दर्शनासाठी उपस्थित राहतो.याप्रसंगी गुरू उपदेशाचेही या ठिकाणी आयोजन करण्यात येत असते. दि.२२ फेब्रुवारला दुपारी महाराजांचे तिळवण येथे प्रस्थान होणार आहे.
 

Web Title: Prasad Maharaj welcomes Lohoner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.