प्रणिती शिंदे घेणार उत्तर महाराष्ट्राचा आढावा; लोकसभेची तयारी सुरू

By संजय पाठक | Updated: October 6, 2023 10:45 IST2023-10-06T10:44:32+5:302023-10-06T10:45:32+5:30

बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत बैठक

Praniti Shinde will review North Maharashtra; Lok Sabha preparations are underway | प्रणिती शिंदे घेणार उत्तर महाराष्ट्राचा आढावा; लोकसभेची तयारी सुरू

प्रणिती शिंदे घेणार उत्तर महाराष्ट्राचा आढावा; लोकसभेची तयारी सुरू

संजय पाठक

नाशिक - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्यावतीने उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी प्रणिती शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. येत्या 9 तारखेला त्या नाशिक मध्ये येणार असून त्यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्राची आढावा बैठक घेण्यात येणार आहे.

माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे सध्या नाशिकच्या समनव्ययक पदाची जबाबदारी आहे. मात्र अलीकडेच प्रणिती शिंदे यांच्याकडे उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे त्या 9 ऑक्टोबर रोजी नाशिकला येणार असून येथील जयशंकर लॉन्स मध्ये उत्तर महाराष्ट्राची आढावा बैठक होणार आहे.
 

Web Title: Praniti Shinde will review North Maharashtra; Lok Sabha preparations are underway