कंपनी सेक्रेटरी परीक्षेत प्रणव महालपुरे नाशकात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 00:54 IST2019-02-23T00:53:51+5:302019-02-23T00:54:21+5:30
इन्स्टिट्यूट आॅफ कंपनी सेक्रेटरी आॅफ इंडियातर्फे (आयसी-एसआय) डिसेंबर २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या कंपनी सेक्रेटरी परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि.२१) रात्री उशिरा जाहीर झाला असून, या परीक्षेत नाशिकचा प्रणव महालपुरे यांने एकूण ४०० पैकी ३१२ गुण संपादन करीत देशात २३, तर नाशिकमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.

कंपनी सेक्रेटरी परीक्षेत प्रणव महालपुरे नाशकात प्रथम
नाशिक : इन्स्टिट्यूट आॅफ कंपनी सेक्रेटरी आॅफ इंडियातर्फे (आयसी-एसआय) डिसेंबर २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या कंपनी सेक्रेटरी परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि.२१) रात्री उशिरा जाहीर झाला असून, या परीक्षेत नाशिकचा प्रणव महालपुरे यांने एकूण ४०० पैकी ३१२ गुण संपादन करीत देशात २३, तर नाशिकमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.
सौरभा महेश्वरी २७६, स्वाती धर्मधिकारी२७०, नम्रता खंडिस्कर, जानवी पाटील २५२, मृण्मयी पंडित २५२, पाल काचेश्वर २४६, पायल भाटिया २३४, प्रियाका बांगर २३४, बॉबी सिंह २२६, दामिनी भंडारी २२६, अर्जिता एम. देशपांडे २२४, सलोनी परमार २२२, मैथिली जोशी २२०, नेहा भावसार २१८, जय ठाकोर २१०, धनश्री कुलकर्णी २०३, रिया हेदंब २०० गुण मिळवून कंपनी सेक्रेटरीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. या परीक्षेत नाशिक शाखेचा ५३ टक्के निकाल लागला असून, शाखेतील ११५ पैकी ६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.