शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे वाचले हरिणीचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 19:00 IST2018-12-10T19:00:22+5:302018-12-10T19:00:57+5:30

ममदापूर येथे कुत्र्यांच्या तावडीत सापडलेल्या हरिणीचे प्राण शेतकºयाच्या सतर्कतेमुळे वाचले. सदर जखमी हरिणीला वनविभागाकडे सुपूर्द करण्यात आले.

 Prana survived the hare due to farmer's alertness | शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे वाचले हरिणीचे प्राण

शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे वाचले हरिणीचे प्राण

ममदापूर येथील शेतकरी ज्ञानेश्वर गोरखनाथ गुडघे हे सकाळी आपल्या शेतात गेले असता त्यांना एका हरणामागे दोन ते तीन कुत्रे धावत असल्याचे लक्षात आले. त्यांनी ताबडतोब त्या कुत्र्यांना हुसकावून लावत त्यांच्या तावडीतून सदर हरिणीची सुटका केली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे हरिण गलितगात्र झाली होती. गुडघे यांनी घरातील सदस्यांना बोलावून हरिणीला पाणी पाजले. त्यानंतर ती शुद्धीवर आली. या घटनेची माहिती वन विभागाचे अधिकारी ज्ञानेश्वर वाघ, पोपट वाघ, रविंद्र निकम व भाऊलाल वाघ यांना दिली. वन विभागाच्या अधिकाºयांनी सदर हरिणीला पुढील उपचारासाठी राजापूर येथील वनविभागाच्या वसाहतीमध्ये नेले. उपचार करून जंगलात बनवलेल्या तारेच्या कुंपणात सोडून देण्यात आले. सदर हरिण पाण्याच्या किंवा चाºयाच्या शोधात रात्री वस्तीच्या दिशेने आली असावी असा अंदाज वनविभागाच्या अधिका-यांनी व्यक्त केला.

Web Title:  Prana survived the hare due to farmer's alertness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.