Pramod Lokhande as District President of the State Disabled Officers Association | राज्य अपंग अधिकारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रमोद लोखंडे
राज्य अपंग अधिकारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रमोद लोखंडे

जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून शासन मान्यता प्राप्त संघटना महाराष्ट्र राज्य अपंग अधिकारी संघटना मुंबई ३२ या संघटनेची जिल्हा अधिवेशन व कार्यशाळा कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृह येथे पार पडली. यावेळी संस्थापक अध्यक्ष दिगंबर घाडगे पाटील व राज्य सचिव ललित सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा रूग्णालयाचे शल्यचिकित्सक सुरेश जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली, तर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांच्या उपस्थितीत जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. जिल्हा सरचिटणीसपदी जिजाभाऊ निकम, जिल्हा कोषाध्यक्ष म्हणून सोमा भालनोर यांची निवड करण्यात आली. यावेळी दिपक बागुल, नारायण दराडे, रामनाथ आरोटे, श्रीधर गीत, सुदाम सांगळे, मच्छिंद्र दराडे आदींसह महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या.

Web Title:  Pramod Lokhande as District President of the State Disabled Officers Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.