रामलिंग महाराज मंदिरात प्राणप्रतिष्ठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 10:50 PM2019-05-16T22:50:04+5:302019-05-16T22:51:00+5:30

सिन्नर : तालुक्यातील पुतळेवाडी (रामपूर) येथे लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या रामलिंग महाराज मंदिराची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्याची सांगता आमरस- पुरणपोळीच्या गोडीने झाली. सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यातून सप्ताह समारोपाला उपस्थित हजारो भाविकांना एक हजार आंब्यांचा रस आणि ८ हजार पुरणपोळ्यांचा महाप्रसाद देण्यात आला. आमरस, पुरणपोळीसह सर्व पदार्थांची मेजवानीच मिळाल्याने हा सोहळा परिसरात चर्चेचा विषय ठरला.

Pramapritiya in Ramalinga Maharaj temple | रामलिंग महाराज मंदिरात प्राणप्रतिष्ठा

सिन्नर तालुक्यातील पुतळेवाडी येथे लोकवर्गणीतून बांधण्यात आलेले रामलिंग महाराज मंदिर.

googlenewsNext
ठळक मुद्देपुतळेवाडी : कलशारोहण सोहळ्याची सांगता

सिन्नर : तालुक्यातील पुतळेवाडी (रामपूर) येथे लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या रामलिंग महाराज मंदिराची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्याची सांगता आमरस- पुरणपोळीच्या गोडीने झाली. सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यातून सप्ताह समारोपाला उपस्थित हजारो भाविकांना एक हजार आंब्यांचा रस आणि ८ हजार पुरणपोळ्यांचा महाप्रसाद देण्यात आला. आमरस, पुरणपोळीसह सर्व पदार्थांची मेजवानीच मिळाल्याने हा सोहळा परिसरात चर्चेचा विषय ठरला.
सिन्नरच्या पूर्व भागातील पुतळेवाडी या छोट्याशा गावात रामलिंग महाराज यांची संजीवन समाधी आहे. येथील ग्रामस्थांनी मंदिराचा लोकवर्गणीतून जीर्णोद्धार केला असून, भव्य-दिव्य अशा मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे. या मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलाशारोहणनिमित्त सप्ताहाचे आयोजन केले. मंगळवारपासून (दि.७) सुरू असलेल्या या प्राणप्रतिष्ठा सप्ताहाला श्री रामलिंग महाराज मूर्ती व कलश मिरवणुकीने सुरुवात झाली होती. त्यानंतर दि. ८ ते १० तीन दिवस होमहवन आणि शुक्रवारी १० तारखेला स्वामी शिवानंदगिरीजी महाराज, कुंभारी येथील श्री १०८ राघवेंद्रगिरी महाराज, प.पू. काशिकानंदगिरी महाराज यांच्या उपस्थितीत कलशारोहण करण्यात आले. येथील व्यंकटेश महाराज यांच्या प्रेरणेतून होत असलेल्या या सप्ताह काळात भीमराज महाराज गेठे यांनी ज्ञानेश्वरी पारायण केले.
यावेळी त्यांच्या समवेत शेकडो ग्रामस्थांनीदेखील ज्ञानेश्वरी पठण केले. दररोज रात्री ९ वाजेदरम्यान नामवंत कीर्तनकारांची कीर्तनसेवा पार पडली. त्यानंतर मंगळवारी (दि. १४) हभप ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सरपंच सरला धारणकर, उपसरपंच ज्ञानेश्वर डेंगळे, चेअरमन रवींद्र खैरनार, सदस्य राजाराम खैरनार, भास्करराव धारणकर, आबासाहेब म्हस्के, विजय कवडे, काशीनाथ नरोडे, नामदेव नवले, शिवाजी गोधडे, सरपंच साहेबराव खैरनार, तंटामुक्ती अध्यक्ष भास्कर नवले, शिवसेना उपतालुकाप्रमुख गोकुळ नरोडे, संजय नवले, आबा जाधव, दत्तात्रय जाधव, गोकुळ पवार, दिनकर नरोडे, संभाजी नवले यांसह ग्रामस्थांनी प्रयत्न केले.आमरसाचे भोजनप्रत्येक गावात होणाऱ्या सप्ताहाच्या समारोपप्रसंगी प्रसादात देण्यात येणाºया भोजनाचे पदार्थ हे जवळपास ठरलेले असतात; मात्र याला छेद देत पुतळेवाडी ग्रामस्थांनी सप्ताहाच्या समारोपाला उपस्थित हजारो भाविकांना चक्क आमरस, पुरणपोळीसह सार, भात, भजे अशा पंचपक्वान्नाची मेजवानी दिली. यासाठी गावातील महिलांनी प्रत्येकाच्या घरून सुमारे सात ते आठ पुरणपोळ्या करून आणल्या. एक हजार किलो आंब्यांचा आमरस तयार करण्यात आला होता. तर सप्ताहठिकाणीच बनविण्यात आलेला सार, भात आणि खमंग भजी आमरसाची गोडी वाढवित होते. सप्ताहाच्या सांगतावेळी आमरसाचे भोजन बहुधा परिसरात प्रथमच आयोजित केले असल्यामुळे परिसरात चर्चेचा विषय ठरला होता.

Web Title: Pramapritiya in Ramalinga Maharaj temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Templeमंदिर