प्रकाश बोराडे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 00:40 IST2020-08-29T00:23:10+5:302020-08-29T00:40:36+5:30
मनपाचे माजी नगरसेवक प्रकाश दामोधर बोराडे (५७) यांचे खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना निधन झाले.

प्रकाश बोराडे यांचे निधन
नाशिकरोड : मनपाचे माजी नगरसेवक प्रकाश दामोधर बोराडे (५७) यांचे खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना निधन झाले. जेलरोड पंचक भागातून १९९७च्या पंचवार्षिकमध्ये ते अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांच्या पत्नी पाचव्यांदा जेलरोड पंचक भागातून नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत.
ते महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सचिव व नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे खजिनदारदेखील होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे. शिवसेनेच्या नगरसेवक रंजना बोराडे यांचे ते पती होत.