Prabhat Ferry created awareness among the students | प्रभात फेरीने केली विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती

प्रभात फेरीने केली विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती

नाशिक : दरवर्षी जागतिक एड्स दिन संपूर्ण देशात साजरा केला जातो. यानिमित्ताने सोमवारी (दि.२) जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रक विभाग, जिल्हा शासकीय रुग्णालयातर्फे नागरिक, महाविद्यालयीन युवकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयीन युवकांनी पुढाकार घेऊन जनजागृती करण्याचे आवाहन केले. तर आरोग्य सेवेचे उपसंचालक डॉ. सुरेश जगदाळे यांनी या आजाराबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा परिषद प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. रत्ना रावखंडे यांनी एड्सबद्दल असलेल्या गैरसमजुतीबाबत तसेच शासन स्तरावरील देण्यात येणाऱ्या सेवांची माहिती दिली. यावेळी कार्यक्रमात उपस्थित युवक व युवतींना एड्सविषयक शपथ देण्यात आली. त्यानंतर हिरवा झेंडा दाखवून प्रभातफेरीची सुरुवात करण्यात आली. ही प्रभात फेरी जिल्हा रुग्णालयापासून जिल्हा परिषद, कालिदास नाट्यगृह, जुने सीबीएस चौक मार्गे पुन्हा जिल्हा रुग्णालय येथे आली. या मार्गाने काढण्यात आली. या फेरीत ३३ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सकचे डॉ. विजय डेकाटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. निखिल सैंदाणे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकचे डॉ. आनंद पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्पना कुटे आदी उपस्थित होते.

Web Title:  Prabhat Ferry created awareness among the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.