विद्युत पारेषणचे सुरक्षारक्षक वाढीव वेतनाच्या प्रतीक्षेत

By Admin | Updated: May 10, 2014 00:26 IST2014-05-09T21:13:29+5:302014-05-10T00:26:37+5:30

नाशिक : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत काम करणारे जिल्हा सुरक्षा मंडळाचे सुरक्षारक्षक गेल्या वर्षभरापासून वाढीव वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत़ याबाबत निर्णय न घेतल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा राष्ट्रीय मजदूर फ ोर्स सुरक्षारक्षक जनरल कामगार युनियनच्या वतीने देण्यात आला आहे़

Power Transmission Protection Waiting for Increase | विद्युत पारेषणचे सुरक्षारक्षक वाढीव वेतनाच्या प्रतीक्षेत

विद्युत पारेषणचे सुरक्षारक्षक वाढीव वेतनाच्या प्रतीक्षेत

नाशिक : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत काम करणारे जिल्हा सुरक्षा मंडळाचे सुरक्षारक्षक गेल्या वर्षभरापासून वाढीव वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत़ याबाबत निर्णय न घेतल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा राष्ट्रीय मजदूर फ ोर्स सुरक्षारक्षक जनरल कामगार युनियनच्या वतीने देण्यात आला आहे़
नाशिक जिल्हा सुरक्षारक्षक मंडळातील सुरक्षारक्षकांना राज्य शासनाने ३ मे २०१३ पासून वाढीव वेतन मंजूर केले आहे़ मूळ वेतनावर प्रत्येकी १३०० रुपयांची ही वाढ असून, याचा लाभ विद्युत पारेषणमध्ये काम करीत असलेल्या २१० सुरक्षारक्षकांना होणार आहे़ जिल्हा सुरक्षा मंडळाच्याच जलविज्ञान विभाग, महाराष्ट्र बँक व महावितरण येथील सुरक्षारक्षकांना ही वाढ लागू झाली आहे; मात्र विद्युत पारेषण कंपनीच्या वतीने या शासन आदेशाची अंमलबजावणी अद्याप करण्यात आलेली नाही़
याबाबत राष्ट्रीय मजदूर फ ोर्स सुरक्षारक्षक जनरल कामगार युनियनच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांसह कामगार आयुक्त, विद्युत पारेषणचे अधिकारी, कामगारमंत्री यांना निवेदने देण्यात आली आहेत; मात्र याचा कोणताही परिणाम संबंधित संस्थेवर झाला नाही़ तसेच सुरक्षारक्षकांना अद्याप वाढीव वेतन मिळालेले नाही़ त्यामुळे या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी न केल्यास कामगार आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा सुरक्षारक्षक संघटनेने दिला आहे़

Web Title: Power Transmission Protection Waiting for Increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.