Potholes at Bhagavar Bazar Road Chowk in Bhagur; Mud swamp | भगूर येथील आठवडेबाजार रोड चौकात खड्डे; चिखलाची दलदल

भगूर येथील आठवडेबाजार रोड चौकात खड्डे; चिखलाची दलदल

भगूर : येथील सोनवणे मिलसमोरील आठवडेबाजार रोड चौकात खड्डे पडून परिसरात चिखलाची दलदल झाली आहे. त्यातून नागरिकांना वाहनांना मार्गक्रमण करावे लागत असून, समस्या कधी दूर होणार याकडे लोकांचे लक्ष लागले आहे. भगूर नगरपालिकेने रस्त्याचे काँक्रिटीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
भगूर शहरातील या ठिकाणाहून राहुरी, दोनवाडे, वडगाव, पिंगळा, पांढुर्ली गावातील नागरिक भगूर गावात प्रवेश करतात, तर भगूर शहरातील नागरिक दररोज सकाळी आठवडे बाजारात शिवशंकर मंदिर, सप्तशृंगी देवी, गणेश मंदिर, राममंदिर, येथे देवदर्शनासाठी जातात. याशिवाय स्मशानभूमीत जाण्यासाठी येथून रस्ता आहे. परंतु महत्त्वाच्या चौकात गेल्या अनेक महिन्यांपासून खड्डे पडले असून, पावसाचे पाण्याने चिखलाची दलदल झाली आहे. रात्रीचे वेळी अपघात घडत आहेत. नागरिकांना चिखलातून जावे लागते, मात्र याकडे दुर्लक्ष करून टाळाटाळ केली जात आहे. भगूर पालिका प्रशासनाने सांगितले की, रस्ता लवकरच केला जाईल, मात्र या चौकातून जाताना नागरिक संताप व्यक्त करताकरीत असून, भगूर पालिकेने त्वरित हा रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी महिला नागरिकांनी केली आहे.

Web Title:  Potholes at Bhagavar Bazar Road Chowk in Bhagur; Mud swamp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.