शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

संमेलन पुढे ढकलल्याने रसिकांच्या उत्साहावर विरजण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2021 12:37 AM

उत्सव सारस्वतांचा; आयोजनाचे धाडस अंगाशी येऊ नये म्हणूनच निर्णय

धनंजय रिसोडकर

नाशिक : कोरोना काहीसा कमी होण्याच्या मार्गावर असताना, संमेलनासाठीचा प्रस्ताव देणारे नाशिककर धाडसी आहेत, अशी भलावण करीत साहित्य महामंडळाकडून साहित्य संमेलन आयोजनाचा काटेरी मुकुट नाशिककरांकडे सोपविण्यात आला होता. मुळात कोरोनाची बेभरवसा स्थिती आणि त्यात आयोजनासाठी अवघा तीन महिन्यांचा अत्यल्प कालावधी अशी परिस्थिती होती. मात्र, तशातही बरीचशी तयारी पूर्णत्वाकडे जात  असतानाच, पुन्हा  कोरोना वाढू लागल्याने अखेर संमेलनाचे धाडस अंगाशी येऊ नये, म्हणून ते पुढे ढकलण्याशिवाय पर्याय आयोजकांपुढे नव्हता. 

कोरोनामुळे संमेलन होणारच नाही, अशीच स्थिती असताना, डिसेंबरमध्ये कोरोनाचे थैमान कमी होऊ लागल्याने साहित्य महामंडळालादेखील उत्साह संचारला. त्यामुळे यंदाच्या आर्थिक वर्षातच संमेलन घेऊन राज्य शासनाचे ५० लाखांचे दान पदरात पाडून घेण्यासाठी संमेलन आयोजनाबाबत तत्परतेने निर्णय घेण्यात आले. ते पदरात पडलेदेखील. स्थानिक अठरा आमदार, खासदारांकडूनही एक कोटीचा निधी पदरात पाडून घेतला. नाशिक महापालिका, जिल्हा परिषदेकडून तसेच इतर मार्गांनी ४ कोटी रुपयांपर्यंत निधी उभारण्याच्या प्रयत्नांना वेग देण्यात आला होता.

निर्णय नाइलाजानेच... सारे काही जुळून येण्याच्या मार्गावर असतानाच, पुन्हा कोरोनाने डोके वर काढले. संमेलनाचे स्वागताध्यक्षच कोराेनाबाधित झाले आणि रसिकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकू लागली. त्यातच आठवडाभरापासून कोरोना वाढीचा नाशिकमधील वेगही तिपटीहून अधिक वाढला. साहित्यिक, प्रकाशक, माध्यमे, शासन, प्रशासनाकडूनही सातत्याने विचारणा होऊ लागली होती. 

 

टॅग्स :NashikनाशिकMaharashtraमहाराष्ट्र