जेष्ठ नागरिकांची दाखल्यासाठी पोस्ट कार्यालयात‌ ‌गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2020 05:55 PM2020-11-03T17:55:58+5:302020-11-03T17:57:01+5:30

निऱ्हाळे : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांना हयातीचा दाखला मिळण्यासाठी सिन्नर पोस्ट कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांची गर्दी केली होती. यावेळी पोस्टमास्तर आर. व्ही. परदेशी यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांना हयातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

At the post office for senior citizen certification | जेष्ठ नागरिकांची दाखल्यासाठी पोस्ट कार्यालयात‌ ‌गर्दी

जेष्ठ नागरिकांची दाखल्यासाठी पोस्ट कार्यालयात‌ ‌गर्दी

Next
ठळक मुद्देतालुका पोस्टमास्तर परदेशी यांच्या हस्ते हयातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

निऱ्हाळे : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांना हयातीचा दाखला मिळण्यासाठी सिन्नर पोस्ट कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांची गर्दी केली होती. यावेळी पोस्टमास्तर आर. व्ही. परदेशी यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांना हयातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

नाशिक येथील प्रवर डाक अधीक्षक मोहन अहिरराव यांच्या सूचनेनुसार सिन्नर पोस्ट कार्यालयात नुकताच ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा सहायक अधीक्षक संदीप पाटील व नाशिक आयपीपीबी शाखा व्यवस्थापक राज आघाव यांच्या उपस्थितीत घेण्यात आला होता. यावेळी हयातीचा दाखला पोस्ट कार्यालयातून दिला जाणार असल्याचे सांगिल्याने सिन्नर पोस्ट कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांनी सोमवारी (दि.२) गर्दी करून पोस्टमनकडून पोस्ट ईन्फो ॲपद्वरा जीवन प्रमाणपत्र बायोमेट्रिक पद्धतीने काढून घेतले. तालुका पोस्टमास्तर परदेशी यांच्या हस्ते हयातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी आर.जी. सोनार, सोपान गंगावणे, बबन डोईफोडे, आर. पी. शिंदे, एम. डी. पवार, एस. के. निरगुडे, बी.जी. घोडे, इ. एम. सोनवणे, आप्पा कुलकर्णी, सविता भसे, व्ही. एच. केदार, बी. डी. दराडे. प्रशांत लोळगे, मनोज निरगुडे, धनंजय शहाणे, एकनाथ बेदाडे, मनोज नांदूरकर, मुरकुटे, वाईत पठाण, विलास सांगळे, सुरेश अनवट, साहेबराव डावरे, ज्ञानेश्वर घोडे आदी उपस्थित होते.
 


 

Web Title: At the post office for senior citizen certification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.