शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

जिल्ह्यातील टपाल बटवड्याचे कामकाज ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 00:35 IST

सरकारच्या कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ विविध संघटनांनी बुधवारी (दि.८) पुकारलेल्या देशव्यापी संपात टपाल कर्मचाऱ्यांनीही सहभाग नोंदविला. शहरी भागातील पोस्टमनपासून ग्रामीण डाकसेवकांसह मेल वाहने चालविणारे चालक संपात उतरल्याने शहरासह जिल्ह्याचे टपाल ‘जैसे थे’ पडून होते. दिवसभर आलेल्या टपालाचा बटवडा नाशिक मुख्य टपाल कार्यालयातून अन्य उपकार्यालये, शाखा कार्यालयांपर्यंतदेखील होऊ शकला नाही. तसेच नाशिक टपाल विभागातील एकूण ८३८ कर्मचाºयांपैकी केवळ २११ कर्मचाºयांनी आपापल्या कार्यालयांत हजेरी लावली.

ठळक मुद्देसंपाचा परिणाम : ३२४ पैकी ११९ उपकार्यालयांत कामकाज

नाशिक : सरकारच्या कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ विविध संघटनांनी बुधवारी (दि.८) पुकारलेल्या देशव्यापी संपात टपाल कर्मचाऱ्यांनीही सहभाग नोंदविला. शहरी भागातील पोस्टमनपासून ग्रामीण डाकसेवकांसह मेल वाहने चालविणारे चालक संपात उतरल्याने शहरासह जिल्ह्याचे टपाल ‘जैसे थे’ पडून होते. दिवसभर आलेल्या टपालाचा बटवडा नाशिक मुख्य टपाल कार्यालयातून अन्य उपकार्यालये, शाखा कार्यालयांपर्यंतदेखील होऊ शकला नाही. तसेच नाशिक टपाल विभागातील एकूण ८३८ कर्मचाºयांपैकी केवळ २११ कर्मचाºयांनी आपापल्या कार्यालयांत हजेरी लावली.नवीन पेन्शन योजना रद्द करावी, सर्व कर्मचाºयांना अखेरच्या पगाराच्या ५० टक्क्यांपर्यंत रक्कम किमान पेन्शनची हमी द्यावी, २०१६ पासून थकलेला घरभाडे भत्ता द्यावा, सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीतील सर्व त्रुटी दूर कराव्या, सर्व केंद्र आस्थापनेतील रिक्त असलेली एकूण ६ लाख पदे त्वरित भरावी, ग्रामीण डाकसेवकांना खात्यात समाविष्ट करा, ग्रॅच्युईटी ५ लाख करावी, निवृत्तीचे सर्व आर्थिक लाभ निवृत्तीच्या दिवशी दिले जावे, अशा विविध मागण्यांसाठी टपाल कर्मचाºयांनी संपात उडी घेतली.आॅल इंडिया पोस्ट एम्प्लॉईज युनियन, नॅशनल असोसिएशन आॅफ पोस्टल एम्प्लॉईज, ग्रुप सी, पोस्टमन व ग्रुप डी, आॅल इंडिया ग्रामीण डाकसेवक युनियन अशा तीनही संघटनांच्या सदस्यांनी संपात सहभाग नोंदविला. यामुळे नाशिक शहरातील मुख्य टपाल कार्यालयापासून या कार्यालयांतर्गत येणारी सर्व उपक ार्यालये, शाखा कार्यालयांसह ग्रामीण भागातील टपालाचा बटवडा ठप्प झाला.सकाळच्या सुमारास टपाल कर्मचाºयांसह पोस्टमन, ग्रामीण डाकसेवकांनी एकत्र येत मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बैठक घेत जोरदार घोषणाबाजी केली.६२७ कर्मचारी संपात सहभागीमुख्य टपाल कार्यालयाच्या अखत्यारितील १२३ पोस्टमनपैकी केवळ ३५ पोस्टमन, एमटीएसचे ५७ पैकी १४ तर ग्रामीण डाकसेवक ३८६ पैकी केवळ ७८ आणि अन्य कार्यालयीन कर्मचारी ४७ सुपरवायझरसह अन्य पदांवरील २२५ अधिकाºयांपैकी ८४ अशा एकूण २११ कर्मचाºयांनी नियमितपणे कर्तव्य बजावले. याव्यतिरिक्त ८३८ कर्मचाºयांनी मात्र संपात सहभागी होणे पसंत केले. परिणामी शहरासह जिल्ह्यातील टपालसेवा प्रभावित झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. नाशिक मुख्य टपाल कार्यालयातील बटवडा कक्षात पोस्टमन नजरेस पडले नाही. संघटनांच्या पदाधिकाºयांनी सुमारे ९२५ पैकी ८०० कर्मचारी संपात सहभागी असल्याचा दावा केला, मात्र प्रवर अधीक्षक कार्यालयाकडून केवळ ६२७ कर्मचारी संपावर असल्याचे सांगितले.

टॅग्स :StrikeसंपPost Officeपोस्ट ऑफिस