जिल्हा रुग्णालयातील दुचाकी चोरटे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 01:17 IST2018-07-18T01:16:37+5:302018-07-18T01:17:25+5:30

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील दुचाकी चोरणाऱ्या दोन अल्पवयीन चोरट्यांना सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून एक लाख दहा हजार रुपयांच्या चोरीच्या तीन दुचाकी जप्त केल्या आहेत़

In possession of two-wheeler robbery in the District Hospital | जिल्हा रुग्णालयातील दुचाकी चोरटे ताब्यात

जिल्हा रुग्णालयातील दुचाकी चोरटे ताब्यात

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील दुचाकी चोरणाऱ्या दोन अल्पवयीन चोरट्यांना सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून एक लाख दहा हजार रुपयांच्या चोरीच्या तीन दुचाकी जप्त केल्या आहेत़
अंबड लिंकरोड परिसरातील रहिवासी शीतल आरक यांची दुचाकी (एमएच १५, बीबी ९२७७) जिल्हा रुग्णालयाच्या वाहनतळातून चोरट्यांनी चोरून नेली होती़ यापूर्वीही जिल्हा रुग्णालयातून दुचाकी चोरीस गेल्याच्या घटना घडलेल्या असून, सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल आहेत़
या दुचाकी चोरट्यांचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी गुन्हे शाखेस सांगितले होते़ त्यानुसार मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.या दोघांची सखोल चौकशी केल्यानंतर त्यांनी तीन दुचाकी चोरल्याची कबुली दिली़
पोलिसांनी या दुचाकी चोरट्यांकडून जिल्हा रुग्णालयातून चोरलेली दुचाकीसह आणखी
दोन दुचाकी (एमएच एफजी ७४९५ व एमएच ०८ एक्स ५४०१) जप्त
केल्या आहेत़ सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली़

Web Title: In possession of two-wheeler robbery in the District Hospital

टॅग्स :Crimeगुन्हा