पॉवर पेनल्टीबाबत सकारात्मक निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 00:40 IST2018-12-30T00:40:01+5:302018-12-30T00:40:20+5:30
पॉवर फॅक्टर पेनल्टीबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेऊन उद्योगांना दिलासा मिळेल, असे आश्वासन एमएसईबी होल्डिंग कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी निमा पदाधिकाऱ्यांना दिले आहे.

पॉवर पेनल्टीबाबत सकारात्मक निर्णय
सातपूर : पॉवर फॅक्टर पेनल्टीबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेऊन उद्योगांना दिलासा मिळेल, असे आश्वासन एमएसईबी होल्डिंग कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी निमा पदाधिकाऱ्यांना दिले आहे.
वीज वितरण कंपनीने १ सप्टेंबरपासून पॉवर फॅक्टरवर पेनल्टी लागू केली आहे. यासंदर्भात निमा शिष्टमंडळाने एमएसईबी होल्डिंग कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांची मुंबई येथील कार्यालयात भेट घेतली. यावेळी निमा शिष्टमंडळाने पॉवर फॅक्टरवर पेनल्टी सहा महिने आकारू नये जेणे करून आवश्यक तांत्रिक बदल करण्यासाठी उद्योजकांना पुरेसा वेळ मिळू शकेल तसेच ज्यांना आकारणी करण्यात आली आहे व आधीच भरली आहे अशांना परतावा मिळावा, या मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. यावेळी झालेल्या चर्चेत सदर मागणीचा गांभीर्याने विचार करून सकारात्मक पावले उचलली जातील, असा विश्वास विश्वास पाठक यांनी दिला आहे. यावेळी निमा औद्योगिक धोरण व विकास समितीचे अध्यक्ष प्रदीप पेशकार व ऊर्जा समितीचे अध्यक्ष रावसाहेब रकिबे, स्टाईसचे नामकर्ण आवारे उपस्थित होते. सदर निवेदन हे भाजपा उद्योग आघाडी, अहमदनगर तसेच जळगावच्या औद्योगिक संघटनांच्या वतीने देण्यात आले.