शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

सण, उत्सव खर्चबंदीवरून राजकीय रणकंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 1:23 AM

सण, उत्सवासाठी खर्चबंदी करण्याच्या महापालिका प्रशासनाच्या निर्णयावरून राजकीय रणकंदन सुरू झाले आहे. यापुढे गणेशोत्सवासह अन्य महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्याही बंद करणार काय? असा प्रश्न शिवसेनेने केला असून, राष्टÑवादीनेदेखील निवृत्तिनाथ महाराज पालखीच्या स्वागताची तयारी केली आहे. तर इदगाह मैदानावरील मंडपासाठी खर्च करण्यास नकार देणारी महापालिका याच मैदानावर व्यावसायिक प्रदर्शने भरवून पैसा कसा वसूल करते, असा प्रश्न केला आहे.

नाशिक : सण, उत्सवासाठी खर्चबंदी करण्याच्या महापालिका प्रशासनाच्या निर्णयावरून राजकीय रणकंदन सुरू झाले आहे. यापुढे गणेशोत्सवासह अन्य महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्याही बंद करणार काय? असा प्रश्न शिवसेनेने केला असून, राष्टÑवादीनेदेखील निवृत्तिनाथ महाराज पालखीच्या स्वागताची तयारी केली आहे. तर इदगाह मैदानावरील मंडपासाठी खर्च करण्यास नकार देणारी महापालिका याच मैदानावर व्यावसायिक प्रदर्शने भरवून पैसा कसा वसूल करते, असा प्रश्न केला आहे.  महापालिकेने पालखी स्वागत आणि रमजान ईदसाठी मंडप नाकारल्यांनतर राजकीय क्षेत्रात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, शिवसेनेने याबाबत महापालिकेतील सत्तारूढ भाजपालाच टार्गेट केले आहे. भाजपाच्या काळातच शहरातील धार्मिक स्थळे हटविण्यात आली तसेच महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या दालनात देवादिकांच्या प्रतिमांवर बंदी आणण्यात आली. आता सण, उत्सवावर बंदी म्हणून गणेशोत्सवात महापालिकेचा मानाचा गणपती यंदापासून नसणार काय, तसेच महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्यांना देखील खर्च केला जाणार नाही का? असा प्रश्न विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी केला.   भाजपा नगरसेवक जगदीश पाटील यांनीदेखील याबाबत पालखी सोहळ्याला आणि रमजानसाठी सुविधा देण्याची मागणी केली आहे. नाशिक शहर धार्मिक ठिकाण असून, याठिकाणी नवरात्रोत्सवात कालिका माता यात्रा भरते, त्यावेळी महापालिका स्टॉलधारकांकडून भाडेदेखील वसूल करीत असते, त्यामुळे अशा सर्व सण, उत्सवांसाठी महापालिकेने निधी उपलब्ध करून द्यावा तसेच शहरातील सण, उत्सवांसाठी आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी केली आहे.  संत वारकरी व पालखीचे स्वागत करण्यास नाशिक महापालिकेने नकार दिल्याने त्याचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संत निवृत्तिनाथ महाराज यांच्या पालखीचे स्वागत करणार असल्याचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी जाहीर केले आहे. या परंपरेस महापालिकेच्या भूमिकेमुळे खंडित पडण्याचे चिन्हे आहे. राज्यातील पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका वारकरी संप्रदायाचे मोठ्या उत्साहात स्वागत करत असतात. परंतु नाशिक महापालिकेच्या भूमिकेमुळे या वर्षांपासून स्वागताच्या परंपरेस तडा जाणार आहे. संत वारकरी व पालखीचे स्वागत करण्यास नाशिक महापालिकेने नकार दिल्याने महापालिकेचा निषेध नोंदवत सामाजिक प्रबोधनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वखर्चाने संत निवृत्तिनाथ महाराज पालखी व वारकºयांचे स्वागत करेल असे ठाकरे यांनी प्रसिध्दी पत्रकात नमुद केले आहे.महापालिकेतील सत्तारूढ भाजपाने याबाबत धोरण स्पष्ट करावे तसेच पालखी स्वागताचा खर्च करता येत नसल्याचेदेखील सांगितल्यास भाजपा खर्च करेल असेही ते म्हणाले. स्थायी समितीचे सदस्य सय्यद मशीय यांनीदेखील मनपाकडे रमजाननिमित्त दरवर्षाप्रमाणे ताडपत्रीचा मंडप टाकण्याची विनंती केली आहे.  इदगाह मैदान हे देखभालीसाठी महापालिकेच्या ताब्यात असतानादेखील त्यावर महापालिका सर्कस, प्रदर्शनासारखे कार्यक्रम घेत असते आणि त्यातून करदेखील मिळविते; मात्र येथे नमाजपठण होत असताना मंडप का नाकारला जात आहे ? असा प्रश्न केला असून, दि. १६ जून रोजी नेहमीप्रमाणे मंडप, तसेच पाणी पुरवण्याची सोय करावी, अशी मागणी केली आहे.महापौरांची केवळ विनंतीमहापालिकेतील सत्तारूढ भाजपा यासंदर्भात काय भूमिका घेते याकडे लक्ष असताना महापौर रंजना भानसी यांनी यासंदर्भात आयुक्तांना केवळ विनंतीपत्र देऊन पालखी स्वागत सोहळा तसेच रमजान ईद स्वागत कक्षासाठी खर्च करण्याची विनंती केली आहे. सत्तारूढ गटानेच इतकी साधी भूमिका घेतल्याने विरोधकांना मात्र टीकेची संधी मिळाली आहे. दुसरीकडे भाजपाचे सभागृह नेते दिनकर पाटील यांनी या विषयावर भाष्य करण्यास नकार दिला.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका