शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

स्त्रीभ्रूणहत्त्या रोखण्यासाठी धोरण हवे : विजयश्री चुंबळे

By admin | Updated: February 27, 2015 00:09 IST

महिला आरोग्य अभियान पंधरवडा शुभारंभ

नाशिक : महिला आरोग्य पंधरवडा अभियानात आरोग्य शिबिराचा लाभ तळागाळातील ग्रामीण भागातील घटकांपर्यंत पोहचेल, अशी दक्षता आरोग्य विभागाने घ्यावी. तसेच स्त्रीभू्रणहत्त्या रोखण्यासाठी सोनोग्राफी केंद्रांवर लिंग चाचणी प्रतिबंध करण्याबाबत आरोग्य विभागाने कडक धोरण स्वीकारावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी केले.शासनाच्या निर्णयानुसार २६ फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान जागतिक महिला आरोग्य दिनाचे औचित्य साधून जिल्हा ग्रामीण रुग्णालय व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यात महिला आरोग्य अभियान पंधरवडा राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा शुभारंभ काल (दि.२६) अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, कार्यक्रमाचे आयोजन हा फक्त देखावा न राहाता कृती व अंमलबजावणी अत्यंत महत्त्वाची आहे. त्याबाबत आरोग्य विभागाने दक्षता घेणे आवश्यक आहे. स्त्रीभू्रणहत्त्या १०० टक्के प्रतिबंधीत होतील, अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही. यावेळी आमदार देवयानी फरांदे यांचेही मनोगत झाले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एकनाथ माले यांनी अभियानाची व्याप्ती सांगितली. ंमुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांत प्राथमिक आरोग्य केंद्रात या अभियानांतर्गत राबविण्याच्या बाबींचे दररोज नियोजन करण्याचे व तसा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. बी. डी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी उद्धव खंदारे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे व डॉ. रवींद्र चौधरी आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)