शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हे दाखल करणार - विश्वास नांगरे पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 18:48 IST

नाशिक शहरात मागील वर्षभरात झालेले अपघात व सद्यस्थितीतील  अपघांतांचे प्रमाणे काही प्रमाणात कमी झाले असले तरी यावर्षी जानेवारीपासून एप्रिलपर्यंत ५९ अपघातांमध्ये ६३ नागरिकांचा रस्ते अपघातांमध्ये मृत्यू झाला आहे. यानुसार दिवसाआड एका व्यक्तीचा अपघाती मृत्यू होत असून हे प्रमाण चिंताजणक आहे.  त्यामुळे रस्ते वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासाठी शहर पोलिसांकडून काटेकोर उपाययोजना सुरू असून यापुढे वाहतूक नियमांचे उल्लंघन करून अपघातास कारणीभूत ठरणाºया वाहन चालकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी शुक्रवार (दि.३) पत्रकार परिषदेत दिलीय   

ठळक मुद्देवाहतूक नियमांचे उल्लंघन करणारांना इशारा अपघातास कारणीभूत ठराल तर सदोष मुष्यवधाचा गुन्हापोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची माहिती

नाशिक : शहरात मागील वर्षभरात झालेले अपघात व सद्यस्थितीतील  अपघांतांचे प्रमाणे काही प्रमाणात कमी झाले असले तरी यावर्षी जानेवारीपासून एप्रिलपर्यंत ५९ अपघातांमध्ये ६३ नागरिकांचा रस्ते अपघातांमध्ये मृत्यू झाला आहे. यानुसार दिवसाआड एका व्यक्तीचा अपघाती मृत्यू होत असून हे प्रमाण चिंताजणक आहे.  त्यामुळे रस्ते वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासाठी शहर पोलिसांकडून काटेकोर उपाययोजना सुरू असून यापुढे वाहतूक नियमांचे उल्लंघन करून अपघातास कारणीभूत ठरणाºया वाहन चालकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी शुक्रवार (दि.३) पत्रकार परिषदेत दिली.हेल्मेटशिवाय दुचाकी वाहन चालविणे, सीटबेल्टचा वापर न करणे, वाहतूक नियम तोडणे यामुळे अपघाती मृत्यूचे प्रमाण वाढले असून अशाप्रकार वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अपघात झाल्यास  संबंधित चालकावरच सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे विश्वास नांगरे पाटील यांनी पोलीस आयुक्तालयातील पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच, वाहतूक नियमांची जनजागृती व हेल्मेट सक्तीबाबत १३ मे पासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या दहा दिवसांच्या कालावधीत नागरिकांनी हेल्मेट उपलब्ध व इतर नियम अभ्यासून घ्यावेत. यानंतर मात्र थेट कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही यावेळी त्यांनी दिला आहे. त्यानंतर १३ मे पासून वाहतूक पोलीस विभाग व सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी आणि कर्मचारी संयुक्तपणे एकाच वेळी कारवाई करणार आहेत. विनापरवाना वाहन चालवणे, मद्यप्राशन करून वाहन चालवणे, वन वे तसेचे उलट दिशेने वाहन चालवणे, ट्रिपल शीट, क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी, ओव्हरलोड वाहने यांच्यावर नियमांचे उल्लंघन केल्यास थेट कारवाई होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :AccidentअपघातNashikनाशिकroad safetyरस्ते सुरक्षाPoliceपोलिसDeathमृत्यू