पोलिसांकडून आंदोलने दडपण्याचा प्रयत्न

By Admin | Updated: February 14, 2016 00:05 IST2016-02-13T23:40:29+5:302016-02-14T00:05:44+5:30

सोमवारी धरणे : जागरूक नाशिककर मंचचा आरोप

Police tried to suppress the agitation | पोलिसांकडून आंदोलने दडपण्याचा प्रयत्न

पोलिसांकडून आंदोलने दडपण्याचा प्रयत्न

नाशिक : शहरातील नागरिक व संघटनांकडून विविध विषयांवर केली जाणारे आंदोलने दडपण्यासाठी पोलीस बळाचा वापर करीत असून, कार्यकर्ते व सामान्यांवर अत्याचार करीत असल्याचा आरोप जागरूक नाशिककर मंचच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे़ याविरोधात सोमवारी (दि़१५) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे़
पोलिसांच्या या दडपशाहीची पुराव्यासह माहिती मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती मंचचे पदाधिकारी व आयटकचे राजू देसले, हंसराज वडघुले यांनी पत्रकार परिषदेत दिली. शहरातील गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ होत चालली असून, पोलीस केवळ बघ्याच्या भूमिकेत आहेत़ एकीकडे गुन्हेगार खुलेआम शहरात फिरत आहेत, तर दुसरीकडे पोलीस सामान्य नागरिकांवर धाक दडपशाही करीत आहेत़
सर्वसामान्यांकडून केल्या जाणाऱ्या आंदोलनासाठी परवानगी मिळावी यासाठी रीतसर पोलीस परवानगीचे पत्र देऊनही त्यास परवानगी मिळत नाही़ यानंतर नियोजनानुसार आंदोलन केल्याने कार्यकर्ते व नागरिकांवर गंभीर गुन्हे दाखल केल्याचे वास्तव आहे़ तसेच या कार्यकर्त्यांना एखाद्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींसारखी वागणूक दिली जात असल्याचा आरोपही मंचच्या पदाधिकाऱ्यांनी केला़ पोलिसांच्या या दडपशाहीविरोधात सोमवारी (दि़१५) दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Police tried to suppress the agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.