पोलिसांच्या टोइंग वाहनाने दांपत्याला उडविले महिला अत्यवस्थ : घटनास्थळाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 02:04 IST2021-08-28T02:04:12+5:302021-08-28T02:04:38+5:30

नाशिक : शहरात रस्त्याला अडथळा ठरणारे वाहन उचलून रस्ता मोकळा करणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या टोइंग वाहनाने शुक्रवारी (दि. २७) सकाळी शरणपूर रोडवरील रचना हायस्कूलसमोर दुचाकीला राँग साइडने ठोस दिल्याने त्यात पती-पत्नी रस्त्यावर कोसळले.

Police tow couple blows up couple in critical condition: Attempt to destroy evidence at the scene | पोलिसांच्या टोइंग वाहनाने दांपत्याला उडविले महिला अत्यवस्थ : घटनास्थळाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

पोलिसांच्या टोइंग वाहनाने दांपत्याला उडविले महिला अत्यवस्थ : घटनास्थळाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

नाशिक : शहरात रस्त्याला अडथळा ठरणारे वाहन उचलून रस्ता मोकळा करणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या टोइंग वाहनाने शुक्रवारी (दि. २७) सकाळी शरणपूर रोडवरील रचना हायस्कूलसमोर दुचाकीला राँग साइडने ठोस दिल्याने त्यात पती-पत्नी रस्त्यावर कोसळले. या महिलेच्या डोक्याला गंभीर मार बसला असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. वाहतूक पोलिसांच्या चौकीपासून अवघ्या काही फूट अंतरावर ही घटना घडूनही त्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने गंभीर जखमी झालेल्या महिलेला चारचाकी लोटगाडीवरून दवाखान्यात दाखल करावे लागले. सातपूरच्या श्रमिकनगर भागात राहणारे शशिकांत अहिरे हे आपली पत्नी माया यांना जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी दुपारी १२ वाजेच्या सुमारास स्कूटीने घेऊन जात असताना रचना शाळेजवळ राँग साइडने आलेल्या पोलिसांच्या टोइंग वाहनाने (क्र. एमएच १५ जीआर- १६९८) त्यांच्या स्कूटीला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे दोन्ही पती-पत्नी रस्त्यावर कोसळले, मात्र पाठीमागे बसलेल्या माया अहिरे ह्या डोक्यावर पडल्याने जागीच बेशुद्ध झाल्या. दरम्यान, हा अपघात होताच, पोलिसांचे टोइंग वाहन तितक्याच गतीने पुढे निघून गेले. दरम्यान, जखमी माया अहिरे यांना उपचारार्थ अगोदर जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले व तेथून नंतर श्रमिक नगरच्या संकल्प हॉस्पिटलला दाखल करण्यात आले असून, त्यांच्या डोक्याला गंभीर मार बसल्याने रक्ताच्या उलट्या होत असल्याचे शशिकांत अहिरे यांनी सांगितले.

चौकट=
हातगाडीवरून नेले रुग्णालयात

पोलिसांच्या टोइंग वाहनाने रस्त्यावर पडलेल्या माया अहिरे यांना रुग्णालात दाखल करण्यासाठीदेखील पोलीस मदतीला आले नाहीत. रक्तस्त्राव व बेशुद्धावस्थेत असलेल्या अहिरे यांना अखेरीस कांदा, बटाटा विक्री करणाऱ्या चारचाकी हातगाडीवरून जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ नेण्यात आले.
चौकट===

वाहतूक पोलीसच प्रत्यक्षदर्शी
वाहतूक पोलिसांच्या टोइंग वाहनावर अमोल अहिरेनामक पोलिसाची नेमणूक करण्यात आली होती. त्याच्या हजेरीतच वाहनचालक बेफामपणे वाहन चुकीच्या दिशेने हाकत होता. अपघात केल्यानंतर साधी विचारपूस न करता पोलिसासमवेत चालकानेही वाहन घेऊन धूम ठोकली. विशेष म्हणजे वाहतूक पोलिसांच्या दंड वसुली चौकीसमोरच हा अपघात घडला. या अपघातानंतर दिवसभर सदरचे टोइंग वाहन पोलिसांनी लपवून ठेवल्याचेही बोलले जात आहे.

Web Title: Police tow couple blows up couple in critical condition: Attempt to destroy evidence at the scene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक