शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात लाखोंचा गुटखा पकडण्यात पोलिसांना यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 12:34 IST

मुंबई-आग्रा महामार्गावरील रासबिहारी चौकातून शुक्रवारी (दि.19) सकाळी 11 वाजेच्या सुमाराला वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांना चकवा देत चारचाकीसह पळ काढणाऱ्या संशयितांचे वाहन अडवून लाखो रुपये किमतीचा गुटखा पकडण्यात नाशिक पोलिसांना यश आले आहे.

ठळक मुद्देनाशकात पकडला लाखोंचा गुटका आडगाव शिवारात वाहतूक पोलिसांची कारवाई चालकासह चारचाकी वाहन व लाखोंचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात पेठ येथील एक जण ताब्यात : गुजरात राज्यातून गुटख्याची वाहतूक 

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील रासबिहारी चौकातून शुक्रवारी (दि.19) सकाळी 11 वाजेच्या सुमाराला वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांना चकवा देत चारचाकीसह पळ काढणाऱ्या संशयितांचे वाहन अडवून लाखो रुपये किमतीचा गुटखा पकडण्यात नाशिकपोलिसांना यश आले आहे.नाशिक शहरातील पंचवटी वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली असून यात पेठ येथील संशयित शंकर येवला (31) याला ताब्यात घेऊन आडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  पंचवटी शहर वाहतूक शाखेचे झेब्रा पथक पोलीस निरीक्षक सदानंद इनामदार यांच्या सूचनेनुसार पोलीस कर्मचारी गणेश माळवाल, राजेंद्र जाधव, अनंत गारे, अमोल काळे असे मुंबई-आग्रा महामार्गावरील सबिहारी चौक परिसरात गस्त घालत असताना त्यांना  आडगाव कडून एक महिंद्रा मार्शल (एमएच 15 आर 3775) येताना दिसली. संबधित चारचाकी वाहन वाहतूक पोलिसांना बघून संशयास्पदरीत्य  रस्त्यात थांबत जाऊ लागल्याने वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांचा संशय बळावला. त्यामुळे पोलिसांनी संबधित वाहन थांबवून चौकशी केली असता वाहनचालक येवला याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांचा वाहनाची तपासणी केली असता त्यात गुटखा आढऴून आल्याने पोलिसांनी येवलासह चार चाकी वाहन व गुटखा असा तीन ते चार लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. येवला पोलिसांना चकवा देत रासबिहारी चौकातून सिडकोकडे पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. याबाबत आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांनी सदर घटनेबाबत दुपारी अन्न व औषध प्रशासनाला माहिती देत पंचनामा केला. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून संशयितांना आडगाव पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

अन्न औषध प्रशासनाविषयी साशंकतानाशिक शहरात दररोज लाखो रुपये किंमतीचा गुटखा चोरी छुप्या पद्धतीने आणला जात असला तरी शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाला याची कोणत्याही प्रकारचा  सुगावा लागत नाही. शिवाय संबंधित अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई केली जात नसल्याने नाशिक शहरात बहुतांश दुकानांमध्ये गुटख्याची विक्री होताना दिसून येते. मात्र या बाबत अन्न व औषध प्रशासन अनभिज्ञ असल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कामगिरीबाबत साशंका व्यक्त होतआहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिसtraffic policeवाहतूक पोलीस