९ वर्षीय मुलाच्या हत्येचा पोलिसांकडून अवघ्या दोन तासात उलघडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2022 19:14 IST2022-12-02T19:14:26+5:302022-12-02T19:14:38+5:30
९ वर्षीय मुलाच्या हत्येचा पोलिसांनी दोन तासात उलघडा केला आहे.

९ वर्षीय मुलाच्या हत्येचा पोलिसांकडून अवघ्या दोन तासात उलघडा
अशोक बिदरी
मनमाड (नाशिक) : शहरातील एकलव्य नगर येथे राहणाऱ्या ९ वर्षीय मुलाचे अपहरण करून त्यावर अनैसर्गिककृत्य केल्यामुळे रडू लागलेल्या मुलाने घरी सांगू नये म्हणून या भीतीपोटी त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचे करवत (हेक्सा ब्लेडने) उजवा हात कापून निर्घृन हत्या केल्याची घटना पोलीस तपासात निष्पण झाली आहे.
या प्रकरणी शहर पोलिसांनी अत्यंत जलद तपास करत अवघ्या दोन तासात सोन्या उर्फ राहुल उत्तम पवार (वय १९ वर्ष) या इसमास अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता संशयतीस ३ दिवासाची कोठडी सोनवण्यात आली आहे. या घटनेने तब्बल २२ वर्षानंतर शुभम लोढा हत्याकांडाच्या आठवणी जाग्या झाल्या.