शहरात पोलीस बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 01:06 IST2019-09-18T01:04:22+5:302019-09-18T01:06:09+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा शहरात असल्यामुळे चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातून शहरात पोलिसांची मोठी कुमक मंगळवारी (दि.१७) दाखल झाली.

Police settlement in the city | शहरात पोलीस बंदोबस्त

शहरात पोलीस बंदोबस्त

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा शहरात असल्यामुळे चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातून शहरात पोलिसांची मोठी कुमक मंगळवारी (दि.१७) दाखल झाली. सुमारे साडेचार हजार पोलीस शहरात आले असून, तपोवनासह संपूर्ण शहराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनीही बंदोबस्त व सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला आहे. सभास्थळाचा ताबा पोलिसांकडून मंगळवारी रात्रीच घेण्यात आला. संपूर्ण परिसर बॉम्ब शोधक-नाशक पथकाकडून पिंजण्यात आला.
मोदी यांची सभा येत्या गुरुवारी (दि.१९) तर फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा बुधवारी (दि.१८) होणारा रोड शो यामुळे पोलीस प्रशासनावर सुरक्षाव्यवस्थेची मोठी जबाबदारी निर्माण झाली आहे. यादृष्टीने शहर व परिसरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Web Title: Police settlement in the city