शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
3
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
4
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
5
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
6
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
7
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
8
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
9
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
10
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
11
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
12
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
13
Share Market Updates 7 August: ट्रम्प टॅरिफ बॉम्बमुळे शेअर बाजार कोसळला, Sensex ८०००० अंकांच्या खाली
14
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
15
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
16
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी
17
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
18
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
19
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
20
Raksha Bandhan 2025 Wishes: रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages, Status आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला

पोलिसांनी घेतला १११ बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 17:02 IST

पंचवटी पोलीस ठाण्याच्या आवारात धुळखात असलेल्या वाहनांपैकी १११चारचाकी, रिक्षा, दुचाकी मालकांचा शोध पोलिसांना लागला आहे. यामध्ये ७ रिक्षा, ८ चारचाकी, ९६ दुचाकींचा समावेश आहे.

ठळक मुद्दे सर्वच पोलीस ठाण्यांमधील बेवारस वाहनांची शोधमोहीम हाती

नाशिक : विविध गुन्ह्यांमध्ये तसेच अपघातांत जमा केलेली वाहने पोलीस ठाण्यांमध्ये वर्षानुवर्षे धुळखात पडून असल्याचे चित्र पहावयास मिळते. वाहनांच्या मुळ मालकांचा शोध घेताना पोलिसांची दमछाक होत असल्याने ‘भंगार’ वाढतच जाते. यामुळे पोलीस ठाणे की जुन्या वाहनांचे गुदाम? असा प्रश्न बघणाऱ्यांनाही पडतो. यामुळे पोलीस आयुक्तांनी ‘पोलीस स्टेशन क्लिनिंग’चे मिशनच जणू हाती घेतले आहे. यासाठी पुण्याच्या एका संस्थेला पाचारण करत भंगार झालेल्या वाहनांमधील बेवारस वाहनांच्या मुळ मालकांचा शोध घेतला जात आहे. सातपूरनंतर पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील तब्बल १११ वाहनांच्या मुळ मालकांपर्यंत पोलिसांना पोेहचता आले.पोलीस आयुक्तालयातील प्रत्येक पोलीस ठाण्यांच्या आवारात शेकडोंच्या संख्येने बेवारस वाहनांचा खच साचला आहे. या वाहनांचे मालक मिळून येत नसल्याने त्यांची विल्हेवाट लावणे पोलिसांकरिता डोकेदुखी बनली आहे. यामुळे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी याकडे लक्ष देत सर्वच पोलीस ठाण्यांमधील बेवारस वाहनांची शोधमोहीम हाती घेण्याचे आदेश दिले. त्याची सुरूवात सातपूर पोलीस ठाण्यापासून करण्यात आली. यांनतर पंचवटी पोलीस ठाण्यातील बेवारस वाहने पुणे येथील गंगामाता वाहन वाहन शोध पथकाच्या मदतीने पंचवटी पोलिसांनी शोधली. ज्या वाहनांचे मुळ मालक मिळून आले आहे, त्यांची वाहने त्यांच्याकडे सुपुर्द केले जातील. त्या मालकांशी याबाबत संपर्क साधला जात आहे. पंचवटी पोलीस ठाण्याच्या आवारात धुळखात असलेल्या वाहनांपैकी १११चारचाकी, रिक्षा, दुचाकी मालकांचा शोध पोलिसांना लागला आहे. यामध्ये ७ रिक्षा, ८ चारचाकी, ९६ दुचाकींचा समावेश आहे.

 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयVishwas Nangare Patilविश्वास नांगरे-पाटीलbikeबाईक