शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
2
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
3
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
4
अमेरिकेने केली इराणची कोंडी, इराणला चारही बाजूंनी अमेरिकेने घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ
5
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
7
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
8
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
9
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
10
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
11
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
12
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
13
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
14
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
15
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
16
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
17
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
18
भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद, आता ५५ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशाची परवानगी
19
‘तातडीने इराण सोडा, मिळेल त्या वाहनाने बाहेर पडा’, भारतीय दूतावासाकडून आपल्या नागरिकांना सूचना
20
रॉकेट बनलाय हा पेनी स्टॉक, ५ दिवसांत दिला ६१% परतावा; फक्त २० रुपयांवर भाव! तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस कुटुंबियांचा विश्वास उंचावतोय : महासंचालक सतीश माथुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 22:42 IST

निमित्त होते, पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शनिवारी (दि.२३) गंगापूररोडवरील शंकराचार्य सभागृहात आयोजित ‘झेप उज्ज्वल भविष्याकडे’ या कर्यक्रमाचे

ठळक मुद्देकौटुंबिक सहलीच्या वाहनाला हिरवा झेंडा दाखविण्यात आला.७० गुणवंत पाल्यांना पोलीस महासंचालकांच्या हस्ते गौरविण्यात आले.

नाशिक : राज्यासह नाशिकमध्ये पोलीस दलासह त्यांच्या कुटुंबियांच्या सर्वांगिण विकासासाठी पोलीस दलाकडून राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांमुळे पोलिसांच्या कुटुंबियांचा विश्वास उंचविण्यास मदत होत आहे. नाशिक पोलीस आयुक्तालयाकडून विविध समाजपयोगी उपक्रमांसह पोलीसांकरिताही आगळेवेगळे उपक्रम सातत्याने राबविले जात असून यामुळे पोलीस दलाची मानसिकता भक्कम होण्यासाठी निश्चित हातभार लागत असल्याचे प्रतिपादन राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी केले.निमित्त होते, पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शनिवारी (दि.२३) गंगापूररोडवरील शंकराचार्य सभागृहात आयोजित ‘झेप उज्ज्वल भविष्याकडे’ या कर्यक्रमाचे. याप्रसंगी माथुर प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. यावेळी व्यासपिठावर विशेष पोलीस महानिरिक्षक छेरिंग दोरजे, औरंगाबादचे पोलीस आयुक्त चिरंजीवप्रसाद, पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल, पोलीस अधिक्षक संजय दराडे, महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या संचालक अश्वती दोरजे, महिला व बालविकास राज्य सचिव श्रीमती विनिता सिंगल, रोहिणी दराडे आदि उपस्थित होते. यावेळी उपआयुक्त माधुरी कांगणे यांनी आयुक्तालयाच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध पोलीस कल्याण कार्यक्र माचे सादरीकरण केले. तसेच शहर व ग्रामीण पोलीस दलातील पोलिसांच्या दहावी-बारावीच्या परिक्षेमध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या सुमारे ७० गुणवंत पाल्यांना पोलीस महासंचालकांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच विविध क्षेत्रांमध्ये प्राविण्य मिळवून उज्ज्वल कामगिरी करणाºया पोलिस अधिकारी-कर्मचा-यांच्या पाल्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने रविजा सिंगल तसेच किरणकुमार जाधव यांचा समावेश होता. प्रारंभी माथुर यांचा सन्मानपत्र व रेखाचित्राची भेट देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान, शिर्डी दर्शनासाठी निघालेल्या शहरातील विविध पोलीस अधिकारी-कर्मचा-यांच्या कौटुंबिक सहलीच्या वाहनाला हिरवा झेंडा महासंचालक सतीश माथुर यांच्या हस्ते दाखविण्यात आला. प्रास्ताविक उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी केले. सुत्रसंचालन सहायक आयुक्त सचीन गोरे यांनी केले व आभार उपआयुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी मानले.

टॅग्स :Policeपोलिसnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय