टेहरेत उपसरपंचाच्या धान्य गुदामावर पोलिसांचा छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 13:27 IST2020-06-29T13:26:26+5:302020-06-29T13:27:34+5:30
मालेगाव : तालुक्यातील टेहरे येथील उपसरपंच नरेंद्र भगवान शेवाळे यांच्या स्वस्तधान्य दुकानाच्या गुदामावर विशेष पोलीस पथकाने छापा टाकून स्वस्त धान्याचा अपहार करुन वाहतूक करुन साठवणूक करताना रंगेहाथ पकडले.

टेहरेत उपसरपंचाच्या धान्य गुदामावर पोलिसांचा छापा
मालेगाव : तालुक्यातील टेहरे येथील उपसरपंच नरेंद्र भगवान शेवाळे यांच्या स्वस्तधान्य दुकानाच्या गुदामावर विशेष पोलीस पथकाने छापा टाकून स्वस्त धान्याचा अपहार करुन वाहतूक करुन साठवणूक करताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी ८ लाख ३९ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून किल्ला पोलीसात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
मुंबई- आग्रा महामार्गावरील टेहरे गावा जवळील कौळाणे गावात गाळणे रस्त्यालगत टेहरेचे उपसरपंच नरेंद्र भगवान शेवाळे यांच्या पत्र्याच्या शेडजवळ संशयित मोहंमद गुफरान अब्दुल सुभान (दलाल) रा. रजापुरा गोल्डननगर, धान्य विकत घेणारा शितल सुभाषचंद्र लोहाडे (४५) रा. सावतानगर संगमेश्वर, अब्दुल इस्हाक अब्दुल सत्तार (दलाल) रा. महेवीनगर, पवारवाडी, वाहन मालक शेख बुºहाण शेख बुढण (५०) रा. गवळीवाडा मर्चंटनगर, चालक शेख इसार शेख इस्हाक (३०) रा. देवीचा मळा, पवारवाडी, चालक फारुख खान रमजान खान (३५) रा. हुडको कॉलनी, गरीब नवाज हॉलच्या पाठीमागे, सय्यद जाफर सय्यद सलीम (हमाल) रा. इंदिरानगर गवळीवाडा, धान्य विकणारा निसार शेख (फरार) दुकान नं. ४३/३ चाल मालक रा. आयेशानगर, धान्य साठवणूक करणारा नरेंद्र भगवान शेवाळे (फरार) रा. कौळाणे रस्ता टेहरे, कुंदन केदार (पीकअप वाहन क्र.) एम.एच.०२ वाय. ए. ६८६० चा फरार मालक रा. मालेगाव कॅम्प. हे जीवनावश्यक स्वस्त धान्य दुकानातून धान्याचा अपहार करुन वाहतूक करुन साठवणूक करताना मिळून आले. संशयितांविरोधात किल्ला पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.जिल्हा पोलीस प्रमुख आरती सिंह व अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते, तुषार गरुड, पोलीस कर्मचारी तुषार अहिरे, अभिजित साबळे, दिनेश शेरावते, सानप व पुरवठा निरीक्षण अधिकारी रणजीत रामाघरे यांनी काल रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास ही कारवाई केली.
-------------------------------------
संशयितांंच्या ताब्यातुन १३९ पोती, २ लाख २२ हजार ४०० रुपये किंमतीचा तांदूळ, ६ लाख रुपये किंमतीचे दोन पीकअप वाहन, १७ हजार ५०० रुपये किंमतीचे सहा भ्रमणध्वनी संच असा एकूण ८ लाख ३९ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.