नाशिकच्या तिडके कॉलनी भागात जुगार अड्यावर पोलिसांचा छापा

By नामदेव भोर | Updated: July 2, 2023 18:29 IST2023-07-02T18:29:34+5:302023-07-02T18:29:46+5:30

या प्रकरणात पोलिस नाईक गोडे अधिक तपास करीत आहेत.

Police raid a gambling den in Tidke Colony area of Nashik |   नाशिकच्या तिडके कॉलनी भागात जुगार अड्यावर पोलिसांचा छापा

  नाशिकच्या तिडके कॉलनी भागात जुगार अड्यावर पोलिसांचा छापा

नाशिक :  तिडके कॉलनीकडून नासर्डी नदीच्या पुलावरून गोविंदनगरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यालगतच्या आमराईतील एका अंब्याच्या झाडाखाली सुरु असलेल्या जुगार अड्यावर छापा मारून पोलिसांनी १० संशयितांवर कारवाई केली असून जुगाराचे साहित्य हस्त केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नासर्डी लगतच्या आमराईत संशयित संदीप रमेश जाधव (३८, रा, लक्ष्मणनगर,पेठरोड) या रायटरसह आकड्याच्या मटक्यावर पैसे लावून खेळणार कचरू महादू कसाळ (४२), विक्रम प्रकाश जाधव (३२, रा. लक्ष्मणनगर), विकास दीपक गायकवाड (३०, रा. लक्ष्मणनगर), अर्जून मनोहर गायकवाड(३२, रा. लक्ष्मणनगर)), केशव दगडूजी मोरे (३९, रा, नवशा गणपती मंदिराजवळ), रवि हनुमंत गुंजाळ (३८ , रा. लक्ष्मणनगर), हितेश प्रल्हाद साकेळुं (४२, रा. मोरवाडी,सिडको) गजानन लिंबाजी भालेराव (४३, रा. सिंहस्थनगर) विरभान नारायण पाटील (५२, रा. लवाटे नगर) यांच्याविरोधात जुगार प्रतिबंध कायद्यानुसार कारवाई करीत गुन्हा दाखल केला असून त्यांच्याकडून ५ हजार २२० रुपयांचे जुगाराचे साहित्य व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिस नाईक गोडे अधिक तपास करीत आहेत.
 

Web Title: Police raid a gambling den in Tidke Colony area of Nashik

टॅग्स :Nashikनाशिक