येवल्यात पोलिसांचे पथसंचलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 18:30 IST2020-05-12T18:29:35+5:302020-05-12T18:30:06+5:30
येवला : शहरासह तालुक्यात आत्तापर्यंत ३१ कोरोनाबाधित रु ग्ण आढळून आल्याने प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.

येवल्यात पोलिसांचे पथसंचलन
येवला : शहरासह तालुक्यात आत्तापर्यंत ३१ कोरोनाबाधित रु ग्ण आढळून आल्याने प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. शहरात मालेगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे, मनमाड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी समीर साळवे यांचे नेतृत्वाखाली शहर पोलिसांनी पथ संचलन केले. पोलिसांच्या या संचलन प्रसंगी शहरवासीयांनी टाळ्या वाजवून उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. दरम्यान, वरिष्ठ पोलीस अधिकारी घुगे, साळवे यांनी शहर पोलीस ठाण्यास भेट देऊन कंटेनमेंट प्लॅन व बंदोबस्त याची माहिती घेतली. शहरातील प्रतिबंधित क्षेत्र व संवेदनशील भागाची पाहणी करतांना बंदोबस्तावरील पोलिस कर्मचारी यांचा उत्साह व मनोबल वाढविणेसाठी मार्गदर्शन केले.