शहरातील दोन पोलीस ठाण्यांचे कारभारी बदलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 00:58 IST2018-10-21T00:58:22+5:302018-10-21T00:58:42+5:30
पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांनी शहरातील म्हसरूळ व मुंबई नाका पोलीस ठाण्यातील कारभारी शनिवारी (दि़२०) बदलले़ यापैकी एका अधिकाऱ्याची आर्थिक गुन्हे शाखेत, तर दुसºयाची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.

शहरातील दोन पोलीस ठाण्यांचे कारभारी बदलले
नाशिक : पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांनी शहरातील म्हसरूळ व मुंबई नाका पोलीस ठाण्यातील कारभारी शनिवारी (दि़२०) बदलले़ यापैकी एका अधिकाऱ्याची आर्थिक गुन्हे शाखेत, तर दुसºयाची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. शनिवारी हे बदलीचे आदेश काढण्यात आले असून, प्रशासकीय कारणास्तव या बदल्या करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली़
म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी सुभाषचंद्र देशमुख यांची वर्णी काही महिन्यांपूर्वी लागली होती़ त्यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागेवर सरकारवाडा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक एस़ जी़ रोहकले (गुन्हे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज करंजे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागेवर पंचवटी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय ढमाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे़
देशमुख व करंजे यांची प्रशासकीय कारणांस्तव बदली करण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी वाढती गुन्हेगारी व गैरप्रकारांमुळे हा बदल करण्यात आल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे.