सहा हजाराची लाच घेताना पोलीस शिपाई ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 20:06 IST2018-08-14T20:05:43+5:302018-08-14T20:06:12+5:30

सहा हजार रु पयांची लाच घेतांना वावी पोलीस ठाण्याअंतर्गत नांदूरशिगोटे पोलीस दुरक्षेत्रात कार्यरत असलेल्या पोलीस शिपायास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.

 Police officers in possession of a bribe of six thousand | सहा हजाराची लाच घेताना पोलीस शिपाई ताब्यात

सहा हजाराची लाच घेताना पोलीस शिपाई ताब्यात

सिन्नर: सहा हजार रु पयांची लाच घेतांना वावी पोलीस ठाण्याअंतर्गत नांदूरशिगोटे पोलीस दुरक्षेत्रात कार्यरत असलेल्या पोलीस शिपायास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.  नांदूरशिगोटे येथे तक्र ारदारची ओम्नी कार पकडण्यात आली होती. सदर गाडी सोडण्यासाठी संशयित पोलीस शिपाई दत्तू भाऊराव दराडे यांनी दहा हजार रु पयांची लाच मागितल्याची तक्र ार नाशिकच्या लाच लुचपत प्रतिबंधात्मक विभागाकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधात्मक विभागाने सापळा रचला होता. मंगळवारी दुपारी नांदूरशिगोटे दुरक्षेत्राात संशियत दराडे यांना लाच घेतांना ताब्यात घेण्यात आले. वावी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Web Title:  Police officers in possession of a bribe of six thousand