पोलीस कर्मचाऱ्यांची त्याच्या मुलांना अमानुषपणे मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 17:43 IST2021-01-17T17:41:00+5:302021-01-17T17:43:05+5:30
इगतपुरी : इगतपुरी रेल्वे पोलीस ठाण्यातील पोलिसानेच आपल्या दोन लहान मुलांना अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी मुलांच्या आजीने तक्रार दिल्यावरून इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असुन या निर्दयी पोलीसाला अटक करण्यात आली आहे.

मुलांना एक महिन्यापासून अमानुषपणे लोखंडी पट्टी व बेल्टच्या साह्याने मारहाण
इगतपुरी : इगतपुरी रेल्वे पोलीस ठाण्यातील पोलिसानेच आपल्या दोन लहान मुलांना अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी मुलांच्या आजीने तक्रार दिल्यावरून इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असुन या निर्दयी पोलीसाला अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार लोहमार्ग पोलीस ठाणे इगतपुरी कर्मचारी राहुल मोरे तळेगाव येथील चंद्रभागा अपार्टमेंटमध्ये राहत्या घरी पहील्या पत्नीच्या ८ वर्षाचा मुलगा साहिल व ५ वर्षाची मुलगी प्रिया या दोन्ही मुलांना आई नसल्याने सावत्र आई मयुरी मोरे राहत आहे.
हा निर्दयी बाप आपल्या दोन्ही लहान मुलांना एक महिन्यापासून अमानुषपणे लोखंडी पट्टी व बेल्टच्या साह्याने मारहाण करीत त्यांचा छळ करत असल्याचे सुरत येथे राहणाऱ्या मुलांच्या आजीला भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिली. आजी यांनी स्वता: येऊन पाहणी केली असता मुलांची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचे निदर्शनात आल्याने त्यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन याबाबत तक्रार दाखल केली.
त्यानंतर राहुल मोरे या रेल्वे पोलिसाला अटक क्ककरण्यात आली असुन या घटनेचा अधिक तपास पोलीस उपअधिक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस दिपक पाटील, उपनिरीक्षक शरद सोनवणे, पोलीस हवालदार विनोद गोसावी, गणेश वराडे, सचिन देसले, वैभव वाणी आदी करीत आहेत. (१७ इगतपुरी १,२,३)