निर्भय मतदानासाठी पोलिसांचे संचलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 00:56 IST2019-10-15T23:20:52+5:302019-10-16T00:56:09+5:30
आगामी विधानसभा निवडणूक शांततेत पार पडण्यासह आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावे, यासाठी पोलीस दलातर्फे गावातील प्रमुख मार्गांवरून सशस्र संचलन करण्यात आले.

पिंपळगाव बसवंत येथे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संचलनात सहभागी पोलीस.
पिंपळगाव बसवंत : आगामी विधानसभा निवडणूक शांततेत पार पडण्यासह आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावे, यासाठी पोलीस दलातर्फे गावातील प्रमुख मार्गांवरून सशस्र संचलन करण्यात आले. पोलीस ठाण्यापासून बसस्थानक, स्टेट बँक, निफाड फाटा, शिवाजी शॉपिंग सेंटर, जुना आग्रा रोड, म्हसोबा चौक, मेनरोड, वेशीमार्गे निफाड फाटा व पुन्हा पोलीस ठाणे असे संचलन केले.
संचलनादरम्यान निर्भयपणे मतदान करा, कोणत्याही मोहाला बळी पडू नका, असे आवाहन ध्वनिक्षेपकावरून करण्यात येत होते. संचलनामध्ये वाहनांच्या ताफ्यासह पिंपळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय महाजन, उपनिरीक्षक युवराज सैदाने, उपनिरीक्षक सुरेश चौधरी, एम. बी. गावित, एस. आय. राजपूत, बी. डी. ठाकूर, डी. बी. वोहोनिया, रवि बारहाते यांच्यासह हवालदार, कॉन्स्टेबल, होमगार्ड व बडोदा (गुजरात) येथील एसआरपी दलाचे नऊ ग्रुप यावेळी सहभागी झाले होते.