शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

उद्ध्वस्त होणारे सव्वाशे संसार पोलिसांनी वाचविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 1:18 AM

समाज साक्षर होत असला तरी काही बुरसटलेल्या विचारसरणीचे लोक अगदी किरकोळ कारणांवरून महिलेचा सासरी छळ करतात आणि वाढत्या कौटुंबिक कलहाला कंटाळून प्रकरण घटस्फोटापर्यंत जाऊन पोहोचते. अशा प्रकरणांचा निपटारा शहरात पोलीस प्रशासनामार्फत समुपदेशनाद्वारे केला जात आहे. पोलीस आयुक्तालयांतर्गत सुरू असलेल्या महिला सुरक्षा विभागाने वर्षभरात १२० संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचविले असून, हे शुभवर्तमान मानले जात आहे.

ठळक मुद्देशुभवर्तमान : महिला सुरक्षा विभागाचे यश; सुशिक्षितांमध्ये वाढता कौटुंबिक कलह

नाशिक : समाज साक्षर होत असला तरी काही बुरसटलेल्या विचारसरणीचे लोक अगदी किरकोळ कारणांवरून महिलेचा सासरी छळ करतात आणि वाढत्या कौटुंबिक कलहाला कंटाळून प्रकरण घटस्फोटापर्यंत जाऊन पोहोचते. अशा प्रकरणांचा निपटारा शहरात पोलीस प्रशासनामार्फत समुपदेशनाद्वारे केला जात आहे. पोलीस आयुक्तालयांतर्गत सुरू असलेल्या महिला सुरक्षा विभागाने वर्षभरात १२० संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचविले असून, हे शुभवर्तमान मानले जात आहे.सुशिक्षित समाजाचे विचार प्रगल्भ होत जातात, हे अगदी खरे आहे. मात्र काहींवर पारंपरिक विचारांचा पगडा असल्यामुळे शहरात अनेकविध सुशिक्षित कुटुंबांमधील कलह चव्हाट्यावर येतात. कुटुंबाची बसलेली घडी विस्क टली जाऊ नये, यासाठी पोलिसांकडून मध्यस्थी केली जात आहे. मागील अनेक वर्षांपासून शरणपूररोड येथील सिग्नलजवळ महिला सुरक्षा विभाग पोलीस आयुक्तालयाकडून कार्यान्वित करण्यात आला आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष डौले यांच्या मार्गदर्शनाखाली येथे कौटुंबिक कलह व त्यामधून दोन कुटुंबांच्या नातेसंबंधात आलेले वितुष्ट कायमस्वरूपी दूर करण्याचा प्रयत्न महिला पोलीसअधिकारी-कर्मचाऱ्यांकडून केला जातो मागील वर्षभरात ६५० पीडित महिलांकडून तक्रारींचे अर्ज महिला सुरक्षा विभागाला प्राप्त झाले होते. त्यानुसार महिलेचे सासर व माहेरच्या नातेवाइकांना बोलावून घेत त्यांची गाºहाणी समजून घेतली गेली तसेच पती-पत्नीलाही बोलावून त्यांचे स्वतंत्ररीत्या म्हणणे ऐकून घेत दोन्ही बाजूंच्या लोकांचा खास करून पती-पत्नीचे समुपदेशनावर अधिकाधिक भर देत एकमेकांविषयी झालेले गैरसमज दूर करण्याचा पोलिसांकडून प्रयत्न केलाजातो.महिलांना कायद्याचे सामान्यज्ञानशहरात शिक्षणाचे प्रमाण चांगले असून, महिला आपले हक्क, कर्तव्यांबाबत सजग असून, त्यांच्यामध्ये महिला सुरक्षाविषयक कायद्यांचे सामान्यज्ञानही दिसून येत असल्याचे डौले यांनी सांगितले. त्यामुळे समुपदेशन करताना फारशा अडचणी उद्भवत नाहीत. प्राप्त झालेल्या ६५० अर्जांपैकी बहुतांश अर्ज हे सुशिक्षित कुटुंबांचे आहेत.अशी आहेत कारणेमहिलेच्या चारित्र्यावर संशय घेणे, शारीरिक तक्रारी, वंध्यत्वाची समस्या, माहेरून पैशांची मागणी, मुलींचाच होणारा जन्म, पतीची व्यसनाधिनता, विवाहबाह्य संबंध, कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे भान नसणे अशी अनेकविध कारणे वैवाहिक जोडप्यांच्या कलहामागील असल्याचे समोर आले आहे. अनेकदा गैरसमजुतींमधून व न्यूनगंडापोटी पती-पत्नी किंवा त्यांच्या नातेवाइकांमध्ये ताणतणाव निर्माण होऊन नातेसंबंधधोक्यात सापडतात.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयFamilyपरिवार