शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

दिंडोरी रोडवर ट्रक्टरच्या धडकेत पोलीस जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 19:02 IST

ट्रक्टर चालकाविरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरिक्षक जाधव करत आहेत.

ठळक मुद्देगळफास घेऊन एकाची आत्महत्या युवकावर चाकूहल्ला    

नाशिक : भरधाव ट्रक्टरने दिेलेल्या धडकेत कर्तव्यावर असलेले पोलीस सेवक जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि.8) दुपारी दिंडोरीरोडवर म्हसरूळ जवळ घडली.

पुंडलिक पांडुरंग बागुल (35,राा. प्रभातनगर, म्हसरूळ, नेमणुक मुंबईनाका पोलीस ठाणे) हे या घटनेत जखमी झाले आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास ते कर्तव्यावरून घरी जात असताना दिंडोरी रोडवर म्हसरूळमधील धर्मानंद अपार्टमेंट समोर भरधाव ट्रक्टरच्या (एमएच 04, इबी 427 ) चालकाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये बागुल जखमी झाले आहेत. या प्रकरणी ट्रक्टर चालकाविरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरिक्षक जाधव करत आहेत.

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

नाशिक : राहत्या घरी गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी एकलहरा कॉलनी परिसरात घडली. सचिन संदेश सातारकर (38, रा. एकलहार कॉलनी) असे आत्महत्या करणार्‍या व्यक्तीचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सातारकर यांनी राहते घरातील सिलिंग फॅनला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वाहनाने दिलेल्या धडकेत महिलेचा मृत्यू

नाशिक : भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.8) सायंकाळी पंचवटीतील शरदचंद्र पवार मार्केट यार्ड परिसरात घडली. राहिबाई बंडु रनमाळे (40, रा.हमालवाडी, पेठरोड, पंचवटी) असे या घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार  शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास राहिबाई या शरदचंद्र मार्केट यार्ड येथे रस्ता ओलांडत असताना भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. यात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

युवकावर चाकूहल्ला    

नाशिक : मोटारसायकल दिली नाही. म्हणुन तीघांनी एकासबेदम मारहाण ककरून चाकूने वार केल्याची घटना शुक्रवारी (दि.8) सायंकाळी टाकळीरोड परिसरातील पंचशीलनगर येथे घडली. प्रेम सुधाकर पवार, अनिकेत पगारे, आकाश दाणी अशी मारहाण करणार्‍या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी गणेश जगदिश भालेराव (22, समतानगर, टाकळीरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी भालेराव हा मित्रांसमावेत गप्पा मारत असताना तेथे आलेल्या संशयितांनी त्यांना मोटारासायकल दिली नाही. अशी कुरापत काढून त्यास बेदम मारहाण केली. तसेच चाकूने वार केले. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयAccidentअपघात