शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

 मुंबई -आग्रा महामार्गालगतच्या पर्यायी बाजारावर पोलिसांची कारवाई ; शेतकऱ्यांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 18:57 IST

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर याठिकाणच्या व्यावहारांवर निर्बंध आले आहेत. त्यामुळे  पाथर्डी, विल्होळी, राजूर, आंबे बहूला, रायगडनगर, वाडिवऱ्हे परिसरातील शेतकºयांनी थेट महामार्गावर शेतमालाची विक्री सुरू केली होती. या ठिकाणच्या व्यावहारांना बाजाराचे स्वरुप येऊन मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागल्याने पोलिसांनी अखेर कारवाई करून शेतकरी व व्यापाऱ्यांना हुसकाऊन लावले.

ठळक मुद्देव्यापारी,शेतकऱ्यांच्या संगन्मताने पर्यायी बाजार गर्दी जमल्याने पोलिसांची पर्यायी बजारावर कारवाईअचानक कारवाईमुळे शेतकऱ्यांची धावपळ

नाशिक: रायगडनगर ते वाडीवऱ्हे दरम्यान मुंबई- आग्रा महामागालगत गेल्या काही दिवसांपासून शेतकरी व व्यापारी यांच्या संगन्मताने चालणारा पर्यायी बाजार पोलिसांनी उधळून लावला. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर याठिकाणच्या व्यावहारांवर निर्बंध आले आहेत. त्यामुळे  पाथर्डी, विल्होळी, राजूर, आंबे बहूला, रायगडनगर, वाडिवऱ्हे परिसरातील शेतकºयांनी थेट महामार्गावर शेतमालाची विक्री सुरू केली होती. या ठिकाणच्या व्यावहारांना बाजाराचे स्वरुप येऊन मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागल्याने पोलिसांनी अखेर कारवाई करून शेतकरी व व्यापाऱ्यांना हुसकाऊन लावले. परंतु, अचानक झालेल्या या कारावई मुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालासग परिसरातील रानमाळात पळ काढाला लागाल्याचे दिसून आले. कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या आवाराताच व्यापाऱ्यांसह अन्य काही नागरिकांनाही कोरोनाची लागन झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर याठिकाणच्या व्यावहारांवर आणि गर्दीवर निर्बंध आले आहे. येथे नोंदणीकृत व्यापाऱ्यांव्यतिरिक्त अन्य खरेदीदारांना प्रवेश दिला जात नसल्याने इतर व्यापारी बाजारसमितीच्या आवाराबाहेर मिळेलल तेथे शेतमाल खरेदी करतात.  त्याचप्रमाणे एकाच वाहनातून अनेक शेतकरी माल घेऊन येतात. मात्र  बाजार समितीत वाहनचालक व एक शेतकख्यालाच प्रवेश मिळतो. त्यामुळे  शेतकऱ्यांची गैरसोय होत असल्याने शेतकरी व व्यापाऱ्यांनी मिळून नाशिक शहरालगत मुंबई- आग्रा महामार्गवर रायगडनगर ते वाडिवऱ्हे दरम्यान अवजड वाहनांसाठी व स्वच्छतागृसाठी असलेल्या खुल्या जागेत छोटेखानी पर्यायी बाजार सुरू केला होता. परंतु, हळुहळू या ठिकाणी शेतकरी आणि ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढू लागल्याने बुधवारी (दि.१०) अखेर पोलिसांनी कारवाई करीत या ठिकाणी जमलेले शेतकरी आणि व्यापाऱ्यांना हुसकावून लावले.

पोलिसांनी अचानक केलेल्या कारवाईमुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचीही धावपळ उडाली. तसेच याठिकाणी थांबलेली अनेक वाहने अचानक महामार्गावर आल्याने काही काळ याठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याचे दिसून आले. तर शेतकऱ्यांना आपला शेतमाल घेऊन अक्षर: परिसरातील माळरानावर पळ काढावा लागल्याचे चित्र दिसून आले. शेतमालाची विक्री कशी करावी नाशिक कृषी उत्तन्न बाजारसमितीत कोरोना विषाणू रुग्ण वाढत चालल्याने अनेक शेतकरी धास्तावले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बाजारसमितीत काही प्रमाणात पालेभाज्या आवक घटली आहे. हे शेतकरी अशा पर्यायी ठिकाणांवर कृषी मालाची विक्री करण्यास प्राधान्य देत आहेत. मात्र पोलिसांच्या कारवाईमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून शेतमालाची विक्री कशी करावी असा प्रश्न निर्माण झाला आहे.  

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिकPoliceपोलिसFarmerशेतकरीAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीvegetableभाज्या