पोलीस आयुक्तालय : तेजस्विनी पुरस्कार प्रदान कर्तृत्ववान महिलांचा सन्मान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 01:22 IST2018-03-11T01:22:45+5:302018-03-11T01:22:45+5:30

नाशिक : जागतिक महिला दिनानिमित्त शहर पोलीस आयुक्तालयातर्फे विविध क्षेत्रांतील २२ कर्तृत्ववान महिला, अधिकारी व कर्मचाºयांना ‘तेजस्विनी’ पुरस्कार देऊन त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यात आला़

Police Commissionerate: Tejaswini Award Honored Women of Excellence! | पोलीस आयुक्तालय : तेजस्विनी पुरस्कार प्रदान कर्तृत्ववान महिलांचा सन्मान!

पोलीस आयुक्तालय : तेजस्विनी पुरस्कार प्रदान कर्तृत्ववान महिलांचा सन्मान!

ठळक मुद्देपूर्वी व आताच्या महिलांमधील सामाजिक बदलांबाबत भाष्य किशोरवयातील शारीरिक बदलाबाबत माहिती

नाशिक : जागतिक महिला दिनानिमित्त शहर पोलीस आयुक्तालयातर्फे विविध क्षेत्रांतील २२ कर्तृत्ववान महिला, अधिकारी व कर्मचाºयांना ‘तेजस्विनी’ पुरस्कार देऊन त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यात आला़ पोलीस मुख्यालयातील बॅरेक नंबर १७ मध्ये पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्रकुमार सिंगल यांच्या अध्यक्षतेखाली व लोकमत वृत्तपत्रसमूहाच्या फिचर एडिटर तथा लेखिका अपर्णा वेलणकर या कार्यक्रमास प्रमुख अतिथी होत्या़ वेलणकर यांनी पूर्वी व आताच्या महिलांमधील सामाजिक बदलांबाबत भाष्य केले़ तसेच मुलींना ज्याप्रमाणे किशोरवयातील शारीरिक बदलाबाबत माहिती देतो त्याचप्रमाणे मुलांनाही द्यायला हवी, असे सांगितले़ पोलीस आयुक्त सिंगल व प्रमुख अतिथी अपर्णा वेलणकर यांच्या हस्ते प्रास्ताविक पोलीस उपआयुक्त माधुरी कांगणे यांनी केले़ पोलीस निरीक्षक नम्रता देसाई यांनी आभार मानले़ यावेळी महापौर रंजना भानसी, पोलीस उपआयुक्तविजय मगर, श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह शांती राधाकृष्णन, स्नेहल कोकाटे, मनाली पाटील, श्रद्धा भुजबळ, सुजाता चव्हाण, शारदा नखाते आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते़
यांचा झाला सन्मान
आंतरराष्ट्रीय धावपटू मोनिका आथरे, श्रद्धा नलमवार (नेमबाज), दीप्ती राऊत (पत्रकार), शोभा पवार (सामाजिक कार्यकर्त्या), लीला जोजारे (प्रशासकीय अधिकारी), अर्चना खेतमाळीस-गोरे (तहसीलदार), लक्ष्मी जाधव (फळविक्रेते), मीराबाई अहिरे (मोचीकाम), मानिनी देशमुख (परिचारिका), गौरी खैरनार, किरण खरे, अबोली लहामगे (पेट्रोलपंप कर्मचारी), नंदा जाधव, सुनीता संगमनेरे (अंशकालीन कर्मचारी), ज्योती डोके, विमल अहेर, संगीता चव्हाण (सफाई कर्मचारी), एम़ आऱ दातीर (लेखा शाखा), मनीषा सोनार (आस्थापना), आऱ एम़ जगताप (पत्रव्यवहार शाखा), मुस्कार खान, प्रियंका एखंडे (सायबर अ‍ॅम्बेसिडर) तसेच महिला पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना तेजस्विनी पुरस्काराने गौरविण्यात आले़

Web Title: Police Commissionerate: Tejaswini Award Honored Women of Excellence!

टॅग्स :Policeपोलिस