शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

विश्वास नांगरे-पाटील नाशिकचे पोलीस आयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 1:49 AM

मागील काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांची बदलीची चर्चा सुरू होती.

नाशिक : मागील काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांची बदलीची चर्चा सुरू होती. त्यांच्या रिक्त पदावर कोल्हापूरचे विशेष महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांची नियुक्ती करण्यात आल्याचे बोलले जात होते. सोमवारी (दि.२५) या दोन्ही चर्चांवर अखेर शिक्कामोर्तब झाले. गृह विभागाकडून भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या व पदोन्नती आणि पदस्थापनेचा आदेश जारी करण्यात आला. लवकरच विश्वास नांगरे-पाटील हे सिंगल यांच्याकडून नाशिक पोलीस आयुक्तालयाचा पदभार स्वीकारतील.डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांची औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली झाली आहे. त्याचप्रमाणे नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नवीन अधीक्षक म्हणून राज्य गुप्त वार्ता विभागाचे उपआयुक्त सुनील कडासने यांची नियुक्ती झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक पंजाबराव उगले यांची जळगावचे नवीन पोलीस अधीक्षकपदी बदली झाली आहे.नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संजय दराडे यांची उपमहानिरीक्षकपदी (वस्तू व सेवा कर) विक्रीकर विभागात पदोन्नतीने बदली झाली आहे. जळगावचे माजी पोलीस अधीक्षक दत्ता कराळे हे ठाण्याचे अपर पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. दरम्यान, नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदी कोणाची वर्णी लागली, ते अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयVishwas Nangare Patilविश्वास नांगरे-पाटील