पोलिसांना दादागिरी अन् रस्त्यात धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 01:17 AM2019-11-12T01:17:53+5:302019-11-12T01:18:18+5:30

शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांना आळा घालण्यासाठी एकीकडे पोलीस प्रशासनाकडून सर्वोपरी प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे मद्यपी व गुंडप्रवृत्तीच्या लोकांकडून थेट क र्तव्यावर असलेल्या पोलिसांनाच दमबाजी व धक्काबुक्की केली जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. अशाप्रकारच्या शहरात दोन घटना घडल्याचे उघडकीस आले आहे.

 Police beat up and threatened police | पोलिसांना दादागिरी अन् रस्त्यात धक्काबुक्की

पोलिसांना दादागिरी अन् रस्त्यात धक्काबुक्की

Next

नाशिक : शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांना आळा घालण्यासाठी एकीकडे पोलीस प्रशासनाकडून सर्वोपरी प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे मद्यपी व गुंडप्रवृत्तीच्या लोकांकडून थेट क र्तव्यावर असलेल्या पोलिसांनाच दमबाजी व धक्काबुक्की केली जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. अशाप्रकारच्या शहरात दोन घटना घडल्याचे उघडकीस आले आहे.
याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, सातपूर औद्योगिक वसाहतीत एका हॉटेलमध्ये शनिवारी (दि.९) संशयित योगेश फुला हिरे (४०) याने मद्यप्राशन केले, मात्र त्यानंतर पैसे न देताच तो जाऊ लागला. त्यावेळी हॉटेलचे व्यवस्थापक तपनकुमार शिवप्रसाद साव यांनी पैशांची मागणी त्याच्याकडे केली, मात्र त्याने शिवीगाळ करत साव यांना मारहाण केली. त्यांच्या अंगावरील कपडे फाडून हॉटेलच्या गल्ल्यातून ५०० रु पये बळजबरीने काढून घेत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या वादाची माहिती मिळताच तत्काळ सातपूर पोलीस ठाण्याचे हवालदार सूर्यवंशी व जावेद खलील शेख हे घटनास्थळी पोहोचले. यावेळी पोलीस कर्मचारी शेख यांनी हिरे यास समजावून सांगत असतानाही त्याचा धुमाकूळ सुरूच होता. त्यावेळी हवालदार सूर्यवंशी यांनी मोबाइलमध्ये गोंधळ टिपण्याचा प्रयत्न केला असता, मद्यधुंद हिरे याने त्यांच्या हातातून मोबाइल हिसकावून घेत जमिनीवर आपटला. त्यानंतर त्याने स्वत:चे डोकेदेखील फरशीवर आपटून फोडून घेतले आणि ‘तुमची नोकरीच घालवितो...’ असा दम भरल्याचे शेख यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात साव यांच्या फिर्यादीनुसार जबरी चोरी, मारहाणीचा गुन्हा तर, शेख यांच्या फिर्यादीनुसार सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास सहायक निरीक्षक मजगर व उपनिरीक्षक चव्हाण हे करीत आहेत.
वाहतूक पोलिसाच्या गणवेशाला ‘धक्का’
शनिवारी (दि.९) दुपारी तीन वाजेच्या सुमारास द्वारका येथील समांतर रस्त्यावर दत्ता किसन गायकवाड (४१, रा. विजयनगर, औरंगाबाद नाका) याने ट्रॅव्हल बस नो-पार्किंग झोनमध्येउभी केली. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याने वाहतूक पोलीस भूषण सूर्यवंशी यांनी धाव घेत बस काढून घेण्यास सांगितले. त्याचा राग येऊन संशयित गायकवाड याने, ‘तू मला ओळखत नाही. मी देवकर मॅडमचा नातेवाईक असून ही गाडी इथेच उभी राहील...’ असे एकेरी बोलत त्यांच्या वर्दीची कॉलर पकडून धक्काबुक्की व शिवीगाळ केली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी गायकवाडविरुद्ध कारवाई केली.

Web Title:  Police beat up and threatened police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.