खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 20:37 IST2018-08-23T20:36:51+5:302018-08-23T20:37:30+5:30

कॉलेजरोडसह कृषीनगर,थत्तेनगर व गंगापूर रोड भागात राजरोसपणे खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून घरगुती सिलेंडरचा वापर होत असल्याच्या तक्रारी पोलिसांनाकडे आल्या होत्या.

Police action on food dealers | खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर पोलिसांची कारवाई

खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर पोलिसांची कारवाई

नाशिक :  घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायीक उपयोग करणा-या कॉलेजरोड परिसरातील खाद्य पदार्थ विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत पाच व्यावसायीकांकडून गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले असून याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात व्यावसायीकांविरूध्द जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
राजू सुर्यवंशी,संदिप भाकरे,जॉस श्रीवास्तव,किरण ठाकुर,राजदीप वन्डेकर अशी संशयीतांची नावे आहेत. कॉलेजरोडसह कृषीनगर,थत्तेनगर व गंगापूर रोड भागात राजरोसपणे खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून घरगुती सिलेंडरचा वापर होत असल्याच्या तक्रारी पोलिसांनाकडे आल्या होत्या. त्यानुसार बुधवारी रात्री व्यावसायीकांच्या हातगाडींवर छापे टाकत पोलिसांनी ही कारवाई केली. अधिक तपास हवालदार गायकर करीत आहेत. 

Web Title: Police action on food dealers

टॅग्स :Nashikनाशिक