नाशिकच्या खडकाळीतील तबेल्यात घोड्यावर विषप्रयोग

By नामदेव भोर | Updated: April 13, 2023 16:46 IST2023-04-13T16:45:25+5:302023-04-13T16:46:14+5:30

नाशिक : खडकाळी परिसरातील पाटकरी लॉजसमोरील तबेल्यातील एका पांढऱ्या रंगाच्या घोड्यावर विषप्रयोग करून त्याला जीवे ठार मारण्यात आल्याची धक्कादायक ...

Poisoning of a horse in a stable in Khadkal, Nashik | नाशिकच्या खडकाळीतील तबेल्यात घोड्यावर विषप्रयोग

नाशिकच्या खडकाळीतील तबेल्यात घोड्यावर विषप्रयोग

नाशिक : खडकाळी परिसरातील पाटकरी लॉजसमोरील तबेल्यातील एका पांढऱ्या रंगाच्या घोड्यावर विषप्रयोग करून त्याला जीवे ठार मारण्यात आल्याची धक्कादायक घटना २७ व २८ मार्च या दोन दिवसाच्या कालावधीत घडली आहे. या प्रकरणात सुलताना जाकिर शेख यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुलताना जाकिर शेख यांना आर्थिक नुकसान पोहोचविण्याच्या उद्देशाने अज्ञात व्यक्तीने त्यांच्या पांढऱ्या रंगाच्या घोड्याला विषारी पदार्थ खाण्यास घालून त्याला जीवे मारण्याचे घृणास्पद कृत्य केल्याचे उघड झाले आहे.

खडकाळी भागातील त्यांच्या तबेल्यात २७ व २८ मार्च या दोन दिवसाच्या कालावधीत ही घटना घडली असून या प्रकरणात सुलताना जाकीर शेख यांनी बुधवारी (दि.१२) भद्रकाली पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती देत अज्ञात व्यक्तीविरोधात फिर्याद नोंदविली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणात पोलिस हवालदार भोळे अधिक तपास करीत आहेत

Web Title: Poisoning of a horse in a stable in Khadkal, Nashik

टॅग्स :Nashikनाशिक