शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

मोदींना मनीऑर्डर पाठवली, 'त्या' कांदा उत्पादक शेतकऱ्याची पीएमओने दखल घेतली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 17:14 IST

नाशिकच्या निफाड तालुक्यातील कांदा उत्पादक संजय साठे यांना नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातून फोन आला.

नवी दिल्ली - कांद्याला प्रति क्विंटल 100 ते 200 रुपयांचा भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्याला पाणी आले आहे. तर, कित्येक शेतकऱ्यांनी आपल्या कांदा बाजार समितीमध्ये नेण्याऐवजी शेतातच सडून दिला. त्यातच, नाशिकमधील एका शेतकऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनाकांदा विकून मिळालेल्या पैशांचे मनीऑर्डर केले होते. आता, पीएमओ कार्यालयाने या शेतकऱ्याच्या तक्रारीची दखल घेतली आहे. 

नाशिकच्या निफाड तालुक्यातील कांदा उत्पादक संजय साठे यांना नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातून फोन आला. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातून साठे यांना कांदा उत्पादन अन् विक्रीसंदर्भात माहिती विचारण्यात आली. साठे यांनी 7.5 क्विंटल कांदा बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणला होता. त्यावेळी, साठेंना प्रति क्विंटल 150 रुपये याप्रमाणे बाजारभाव मिळाला. उत्पादन खर्च तर सोडाच, पण वाहतूक अन् हमाली खर्चही या पैशांतून वसुल होईना. त्यामुळे संतापलेल्या साठे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच कांद्यातून मिळालेले 1064 रुपये मनीऑर्डरने पाठवले होते. त्यानंतर पीएमओ कार्यालयाने या मनिऑर्डरची दखल घेतली आहे. पीएमओ कार्यालयाने साठे यांच्या तक्रारीची दखल घेत, नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाला फोन करुन संदर्भात माहिती मागविली आहे. त्यामुळे आता तरी शेतकरी साठे यांना आणि राज्यातील शेतकऱ्यांना सरकारकडून काही दिलासा मिळेल, अशी आशा पल्लवीत झाली आहे.

टॅग्स :onionकांदाNashikनाशिकNarendra Modiनरेंद्र मोदी