शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
3
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
4
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
5
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
6
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
7
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
8
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
9
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
10
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
11
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
12
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
13
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
14
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
15
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
16
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
17
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
18
Jasprit Bumrah: आयपीएलदरम्यान जसप्रीत बुमराहनं पत्नी संजनाला नेलं डेटवर, शेअर केला खास फोटो
19
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
20
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!

नाशकात राज्यप्राणी शेकरुच्या विक्रीचा डाव उधळला; वनविभागाचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 19:48 IST

पश्चिम घाटात कळसुबाई-हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्यात शेकरुच्या संवर्धनासाठी विशेष परिश्रम घेतले जात असताना नाशिक शहरात थेट शेकरु विक्रीसाठी पाळीव प्राणी-पक्षी विक्रीच्या दुकानापर्यंत येऊन पोहचल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ठळक मुद्देसराईत संशयित विक्रेता ताब्यातशेकरुचे संवर्धन धोक्यातवनविभागाला खोलवर तपास करावा लागणार

नाशिक : वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये अनुसुची-१मध्ये समाविष्ट आणि राज्यप्राण्याचा दर्जा असलेल्या दुर्मीळ शेकरुची विक्री करण्याचा धक्कादायक प्रकार नाशिक शहरातील कॉलेजरोड-महात्मानगर परिसरातील एका पेट स्टोरमध्ये उघडकीस आला आहे. शनिवारी (दि.१८) नाशिक पश्चिम वनविभागाच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन छापा टाकून संशयित दुकानमालकाला ताब्यात घेतले. तसेच विक्रीसाठी ठेवलेले शेकरू सुरक्षित रेस्क्यु केले.वन्यजीवांची तस्करी कायद्याने अजामीनपात्र असा गंभीर स्वरुपाचा गुन्हा असतानाही नाशिक शहरातील उच्चभ्रू परिसर असलेल्या कॉलेजरोड परिसरातील सौरव एक्झॉस्टिक व ॲक्वेटिक पेट स्टोर नावाच्या दुकानात पुर्ण वाढ झालेले सुमारे तीन ते चार वर्षे वयाचा शेकरु हा वन्यप्राणी विक्रीसाठी पिंजऱ्यात बंदिस्त करुन ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मिळालेल्या गुप्त माहितीवरुन सहायक वनसंरक्षक गणेश झोळे, वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांच्या पथकाने मानद वन्यजीव रक्षक वैभव भोगले यांच्यासमक्ष शिताफीने दुकानावर छापा टाकला. यावेळी शेकरुला रेस्क्यु करण्यात आले तसेच दुकानमालक संशयित आरोपी सौरव रमेश गोलाईत (२३,रा.दसक, जेलरोड) यास वनविभागाच्या कारवाई पथकाने ताब्यात घेतले आहे.सदाहरित किंवा निमसदाहरीत वनात आढळणारा अत्यंत लाजाळु असा वन्यप्राणी म्हणून शेकरुची ओळख आहे. काळानुरुप जंगलांचा होणारा ऱ्हास या वन्यप्राण्याच्या जीवावर उठला असताना आता तस्करांनीही या जीवाकडे वक्रदृष्टी केल्याने संताप व्यक्त होत आहे.

शेकरु वन्यजीव अत्यंत चपळ व तितकेच लाजाळू असतानाही विक्रीसाठी संशयिताने त्यास कसे व कोणाच्या मदतीने आणि कोठून जेरबंद केले? हा मोठा प्रश्न वन्यजीवप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे. या प्रकरणात वनविभागाला कसोशिने खोलवर तपास करावा लागणार आहे, कारण शेकरु या वन्यजीवाची तस्करी होणे ही धक्कादायक बाब आहे.

टॅग्स :Nashikनाशिकwildlifeवन्यजीवforest departmentवनविभाग