भेंडाळीत रस्त्यांची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 15:30 IST2019-11-22T15:30:00+5:302019-11-22T15:30:45+5:30
सायखेडा: भेंडाळी येथील शिवार रस्त्यांचे कामे अनेक दिवसांपासून रखडले होते, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अशी शिवार रस्त्यांची कामे होणे गरजेचे असूनही अनेक वर्षांपासून रस्त्यांची दुर्दशा झाली होती शेतात वस्तीवर रहाणाº्या नागरिकांना ये-जा करतांना समस्या निर्माण होत होती

पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने भेंडाळी येथे शिवार रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करतांना दिनकर खालकर, उत्तम शिंदे,दीपक कमानकर,संदिप सातपुते,संजय कमानकर आदि
दुरु स्तीचे काम:पिंपळगाव बाजार समितीचा उपक्रम
सायखेडा: भेंडाळी येथील शिवार रस्त्यांचे कामे अनेक दिवसांपासून रखडले होते, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अशी शिवार रस्त्यांची कामे होणे गरजेचे असूनही अनेक वर्षांपासून रस्त्यांची दुर्दशा झाली होती शेतात वस्तीवर रहाणाº्या नागरिकांना ये-जा करतांना समस्या निर्माण होत होती, शाळेतील विध्यार्थी अनेक ठिकाणची खड्डे पार करून चिखल तुडवत शाळेत येत असत अश्या रस्त्यांची कामे करण्याची मोहीम पिंपळगाव बाजार समतिीच्या माध्यमातून दुरु स्तीचे काम सुरू झाले.
निफाड तालुक्यात मुख्य गावांना जोडणारी अनेक रस्ते चांगले असले तरी शिवार रस्त्यांची दुर्दशा झाली आहे, तालुक्यात गोदावरी,कादवा, बाणगंगा नदीचे खोरे आहे त्यामुळे काळी कसदार जमीन ,मुबलक पाणी असल्याने रस्ते फारसे टिकत नाही, रस्ते लवकर मातीत फसतात त्यामुळे वारंवार कामे करावे लागतात, रस्ते विकास करणाऱ्या विविध योजनेतून शिवार रस्ते दुरु स्त केली जात नाही,
भेंडाळीत धोंड्याई मळ्यातील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ केला आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य गोरख खालकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष किसन खालकर,रमेश कमानकर,रामेश्वर खालकर, भानुदास खालकरआदि ग्रामस्थ उपस्थित होते