विल्होळी औद्योगिक वसाहतीत रस्त्याची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 00:46 IST2018-05-01T00:46:41+5:302018-05-01T00:46:41+5:30

येथील विल्होळी ते औद्योगिक वसाहत रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली असून, रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. सदर रस्त्याने विल्होळीतील हजारो कामगार ये-जा करीत असून, रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. संबंधितांनी याची दखल घेत तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी कामगार व नागरिक यांनी केली आहे.

 The plight of road in Vilholi industrial estate | विल्होळी औद्योगिक वसाहतीत रस्त्याची दुर्दशा

विल्होळी औद्योगिक वसाहतीत रस्त्याची दुर्दशा

विल्होळी : येथील विल्होळी ते औद्योगिक वसाहत रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली असून, रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. सदर रस्त्याने विल्होळीतील हजारो कामगार ये-जा करीत असून, रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. संबंधितांनी याची दखल घेत तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी कामगार व नागरिक यांनी केली आहे. हा रस्ता नाशिक जिल्हा परिषदेच्या हद्दीतील असून, औद्योगिक वसाहत अंबड येथे जाण्यासाठी शॉर्टकट असल्याने छोटे-मोठे वाहन याच रस्त्याने ये-जा करतात. त्यामुळे या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे व होणारे अपघात टाळावे, अशी मागणी कामगार, परिसरातील ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. याच रस्त्यावर अनेक मोठ्या कंपन्या असून, त्यांचीही वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. कामगार दोन शिपमध्ये काम करीत असून, या खराब रस्त्यामुळे त्यांना अगणित समस्यांचा सामना करावा लागत आहे.

Web Title:  The plight of road in Vilholi industrial estate