प्लॅस्टिकमुक्ती, स्वच्छता जनजागृती अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 12:34 AM2019-12-10T00:34:46+5:302019-12-10T00:35:09+5:30

देवळाली शहरात प्लॅस्टिकमुक्ती, स्वच्छता जनजागृती अभियान मोहीम राबविण्यात आली.‘प्लॅस्टिक से रक्षा, स्वच्छता ही सुरक्षा’ अभियानांतर्गत सुमारे ७७ पोते प्लॅस्टिक कचरा संपूर्ण देवळाली शहरातून जमा करण्यात आला. येथील कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाकडून स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात येत आहे.

 Plastic liberation, Sanitation awareness campaign | प्लॅस्टिकमुक्ती, स्वच्छता जनजागृती अभियान

प्लॅस्टिकमुक्ती, स्वच्छता जनजागृती अभियान

Next

देवळाली कॅम्प : देवळाली शहरात प्लॅस्टिकमुक्ती, स्वच्छता जनजागृती अभियान मोहीम राबविण्यात आली.‘प्लॅस्टिक से रक्षा, स्वच्छता ही सुरक्षा’ अभियानांतर्गत सुमारे ७७ पोते प्लॅस्टिक कचरा संपूर्ण देवळाली शहरातून जमा करण्यात आला. येथील कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाकडून स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात येत आहे.
याअभियानाअंतर्गत प्लॅस्टिक सुरक्षा, स्वच्छता ही सुरक्षा असे ब्रीद असलेल्या प्लॅस्टिक संकलन अभियानाचे येथील ऐतिहासिक झेंडा चौकात खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. डॉ. सुभाष हायस्कूल, कॅन्टोन्मेंट बोर्ड हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सदर बाजार भागात, कॅन्टोन्मेंट आॅफिस स्टाफसह देवळाली हायस्कूलच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी नागझिरा नाला व हाडोळा परिसरातून, नूतन विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी रेस्ट कॅम्प रोड व विजयनगर भागातून, भगूर बसस्थानकाच्या मोकळ्या पटांगणात बार्न्स स्कूलचे विद्यार्थी, लॅमरोडवर एसव्हीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य विजय मेधने यांसह सर्व विद्यार्थ्यांनी धोंडीरोडवर सेंट पॅट्रिक स्कूल, आनंद रोडदर्शन अकॅडमी, जुनी व नवी स्टेशनवाडी परिसरात कॅन्टोन्मेंट बोर्ड शाळा, दर्शन अकॅडमी, तर विजयनगर परिसरात नूतन विद्यामंदिरचे विद्यार्थी सहभागी होत रस्त्याच्या दुतर्फा पडलेले प्लॅस्टिक संकलित केले.
याप्रसंगी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष भगवान कटारिया, नगरसेवक सचिन ठाकरे, कावेरी कासार, प्रभावती धिवरे, आशा गोडसे, सीईओ अजय कुमार, भाऊसाहेब धिवरे, रतन कासार, चंद्रकांत गोडसे, सहायक अभियंता विलास पाटील यांसह सर्व कार्यालयीन विभागप्रमुख, हॉस्पिटलसह शाळेचे शिक्षक यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या मोहिमे दरम्यान मुख्य कार्याधिकारी अजय कुमार, आरोग्य विभागाचे अधीक्षक रजिंदरसिंह ठाकूर, सहायक अधीक्षक युवराज मगर, स्वच्छता निरीक्षक निरीक्षक अतुल मुंडे, शिवराज चव्हाण, धीरज डूलगज, सोमनाथ निसाळ, सोमनाथ कढभाने, रोहिदास शेंडगे आदींसह सर्व आरोग्य विभागाचे कर्मचारी प्रयत्नशील होते.
बार्न्स स्कूल प्रथम
या मोहिमेत सर्वाधिक (११ पोते) प्लॅस्टिक कचरा जमा करणाऱ्या बार्न्स स्कूलच्या विद्यार्थ्यांना प्रथम, सेंट पॅट्रिक्स स्कूल
(१० पोते), नूतन विद्यामंदिर व कॅन्टोन्मेंट हायस्कूल (९ पोते) कचरा संकलन केल्याने त्यांना तृतीय क्र मांकाचे पारितोषिक विभागून देण्यात आले. सर्वाधिक प्लॅस्टिक गोळा केल्याबद्दल बार्नस्कूल, सेंटपँट्रिक हायस्कूल, नूतन विद्यामंदिर दे.कॅम्प, कॅन्टोन्मेंट बोर्डाची शाळा या शाळेंचा विशेष सत्कार करण्यात आला.

Web Title:  Plastic liberation, Sanitation awareness campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.