कोटमगावात श्रमदानातून प्रबोधन प्लॅस्टिक संकलन ; अभियान सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 00:53 IST2019-11-09T23:08:52+5:302019-11-10T00:53:08+5:30

कोटमगाव (ता.नाशिक) येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्वच्छतादर्पण कार्यक्रमाअंतर्गत महाश्रमदान व प्लॅस्टिक संकलन अभियानाची सुरु वात करण्यात आली.

Plastic Collection of Prabodhan Plastics from Labor in Kotamgaon; Campaign started | कोटमगावात श्रमदानातून प्रबोधन प्लॅस्टिक संकलन ; अभियान सुरु

कोटमगाव ( ता.नाशिक) येथे प्लॅस्टिकमुक्त परिसर व ग्रामस्वच्छता अभियान राबविताना सरपंच बाळासाहेब म्हस्के, उपसरपंच मीराबाई घुगे, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ.

एकलहरे : कोटमगाव (ता.नाशिक) येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्वच्छतादर्पण कार्यक्रमाअंतर्गत महाश्रमदान व प्लॅस्टिक संकलन अभियानाची सुरु वात करण्यात आली.
या कार्यक्र मात प्लॅस्टिकमुक्त परिसर, प्लॅस्टिकचे दुष्परिणाम यावर व्याख्यान व चर्चासत्र, गावात फिरून प्लॅस्टिक संकलन करण्यासाठी गावकऱ्यांचे श्रमदान आदी उपक्र म राबविण्यात आले. कोटमगावचे लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब म्हस्के यांच्या पुढाकाराने गावकऱ्यांनी श्रमदान करून गावातील गल्लीबोळात फिरून ग्रामस्वच्छता केली. यावेळी ५० किलो प्लॅस्टिक गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. यावेळी गावातील मुख्य चौकात प्लॅस्टिकचे दुष्परिणाम याविषयी चर्चासत्र व व्याख्यानाच्या माध्यमातून गावकºयांचे प्रबोधन करण्यात आले. यावेळी लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब म्हस्के, ग्रामपंचायत उपसरपंच मीराबाई दिलीप घुगे, सदस्य समाधान जाधव, साहेबराव म्हस्के, चंद्रभान म्हस्के, नानाभाऊ घुगे, बाळासाहेब घुगे, सोमनाथ कुवार, ग्रामसेवक बाळासाहेब कदम, अंगणवाडी सेविका विमल म्हस्के, सुनंदा जाधव, विमल काळे, माने मॅडम, आरोग्य विभागाच्या प्रतिभा गोसावी, गणेश गोसावी, राजू शिंदे, रेशन दुकानदार भगवान धोंगडे, वायरमन युवराज घायवटे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद म्हस्के, पालक संघाचे अध्यक्ष विष्णु घुगे या सर्वांनी गावात, किराणा दुकान, वेगवेगळे दुकाने, गृहभेटी देऊन ५० किलो प्लॅस्टिक संकलन केले व प्लॅस्टिकमुळे होणारे दुष्परिणाम यावर प्रबोधन केले.

Web Title: Plastic Collection of Prabodhan Plastics from Labor in Kotamgaon; Campaign started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.